मुंबई : कलाकाराचा प्रेक्षकांशी संवाद होणं ही महत्वाची बाब. यासाठी आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हा उपयुक्त ठरतो. लॉकडाऊनच्या काळात तर सोशल मीडियाने आपलं महत्व अधोरेखित केलं आहे. या सगळ्याची उपयुक्तता पाहून आता अभिनेता डॉ. निलेश साबळे यांनी इंस्टाग्रामवर पदार्पण केलं आहे.  ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाची यशस्वीपणे धुरा सांभाळणारा निलेश आतापर्यंत सोशल मीडियापासून लांब होता. मात्र, नुकतीच त्याने इन्स्टाग्रामवर दणक्यात एण्ट्री केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियापासून मी लांब होतो. कारण मला तेवढा वेळ ही नव्हता. पण आता प्रेक्षक माझ्यापर्यंत पोहोचतात तर मलाही प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला हवं, असं म्हणत हे इंस्टाग्राम अकाऊंट सुरू केलं आहे. 



निलेशच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन चला हवा येऊ द्याच्या संपूर्ण टीमने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये निलेश साबळे त्याला फॉलो करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचसोबत हेच निलेशचं ऑफिशिअल अकाऊंट असल्याचंदेखील यावेळी त्यांनी सांगितलं आहे. 



‘काय मंडळी हसताय ना…हसायलाच पाहिजे’, असं म्हणत डॉ. निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाची सुरुवात करतात. निलेश साबळे यांचे असंख्य चाहते आहेत. त्यामुळे त्याच्याशी थेट संवाद साधावा, त्याच्याविषयीचे अपडेट्स जाणून घ्यावे अशी कायमच चाहत्यांची इच्छा असते. त्यामुळे चाहत्यांची ही इच्छा यापुढे पूर्ण होणार आहे.