मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या धामधुमीत सर्वच पक्ष त्यांच्या परिने प्रचारांसाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहेत. तर, इथे कलाकार मंडळीही मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक व्यक्तीने कोणीही न सांगता स्वत:हून मतदानासाठी पुढाकार घ्यायला हवा, असं म्हणत विनोदवीर, भारत गणेशपुरे यांनी मतदारांना आवाहन केलं आहे. 'आपला प्रतिनिधी निवडण्याचा हा हक्काचा दिवस असतो. शिवाय आपल्या देशासाठी आणि राष्ट्रासाठी मतदान ही महत्त्वाची गोष्ट आहे,” असेही त्याने सांगितले.  


मुंबई उपनगर जिल्ह्यातर्फे बोरीवली येथील बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या मतदान जागृती कार्यक्रमात ते बोलत होते. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली मतदानाच्या जनजागृतीसाठी ‘स्वीप’ (सिस्टीमॅटीक वोटर्स एज्युकेशनल अँड इलेक्ट्रोल पार्टीसिपेशन प्रोग्रॅम) हा कार्यक्रम राबवला जातो. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, उपजिल्हाधिकारी सोनाली मुळे, महापालिका सहआयुक्त भारत मराठे अभिनेत्री हेमांगी कवी आणि निशा परुळेकर यांनीही उपस्थितांना मतदान करण्याचे आवाहन केले. 


'स्वीप' कार्यक्रमाचे विशेष कार्यकारी अधिकारी सुभाष दळवी, घनकचरा व्यवस्थापन तज्ज्ञ अश्विनी बोरुडे, दिव्यांग मतदारांचे प्रतिनिधी सुनील दशपुत्रे उपस्थित होते. उपनगरातील २६ मतदार संघातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे यासाठी कलाकारांच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले.