मुंबई :  झी मराठी चॅनलवर 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमामुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेला अभिनेता विनीत भोंडे लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. आता आपल्याला विनीत 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात दिसत नाही. पण त्याला या कार्यक्रमानेच नवी ओळख मिळून दिली आहे. गेल्या ४ फेब्रुवारीला औरंगाबाद येथील राहत्या घरी विनीतचा घरगुतीपद्धतीने साखरपुडा झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनम पवार हिच्याशी त्याचा साखरपुडा झाला. गेली दहा वर्ष तो आपल्या अभिनयाचा ठसा रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमध्ये उमटवत आहे.  दिसायला लहान असला तरी आपल्या कॉमेडी टायमिंगच्या जोरावर त्याने एक नवी 'उंची' गाठली आहे



विनीत हा मूळचा औरंगाबादचा आहे. त्याला बालपणापासून अभिनयाची आवड आहे. त्याने  मराठवाडा विद्यापीठातून नाट्यशास्त्रात बी.ए.ची पदवी प्राप्त केली आहे. विनीत हा उत्तम नकलाकार आहे. एकपात्री प्रयोगातून त्याने बालनाट्याला सुरूवात केली. 


लक्ष्य नावाच्या एकांकिकाच्या जोरावर दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी विनीतला 'डोंबिवली फास्ट' या चित्रपटा पहिला ब्रेक दिला. अभिनेता भारत गणेशपुरे यांच्या मैत्रीमुळे त्याला 'चला हवा येऊ द्या' या हास्याची कारंजी फुलविणाऱ्या कार्यक्रमात काम करण्याची संधी मिळाली. 


चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने त्याला भरपूर दिले. त्याची पहिली परदेशवारी ही याच कार्यक्रमामुळे घडली. तो या टीमसोबत सिडनीला गेला होता. 


मुंबईत त्याचे स्वतःचे घर आहे. २०१६ मध्ये त्याने बोरिवलीत घर घेतले. सध्या तो नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांना भेटत आहे. 'करून गेलो गाव' यात त्याने भाऊ कदम सोबत काम केले आहे. तसेच तो सध्या 'शुभ दंगल सावधान' नाटकात काम करत आहे.