Shreya Bugde Trolled: अभिनेत्री श्रेया बुगडनं आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहे. कॉमेडी क्विन (Comedy Queen) म्हणून आता तिची ओळख लोकप्रिय झाली आहे. श्रेया बुगडे ही सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते त्याचबरोबर तिचं फॅन फॉलोईंगही (Shreya Bugde) जबरदस्त आहे. काही दिवसांपुर्वी श्रेयानं आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून एक व्हिडीओ पोस्ट (Viral Videos) केला होता ज्यात ती 'चला हवा येऊ द्या'च्या (Chala Hawa Yeu Dya) मंचावरून एका वेगळ्या लुकमध्ये दिसली होती. हा लुक पाहून अनेकांना सागर कांरडेच्या (Sagar Karande as Postman) पोस्टमनची आठवण झाली. हो, हा तोच रोल आहे जेव्हा सागर कारंडेनं पोस्टमन साकारून अनेकांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. त्या पत्रातून वेगवेगळ्या विषयांवर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. त्यामुळे सर्वत्र सागर कारंडेच्या सादरीकरणाचे कौतुक झाले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु गेल्या काही दिवसांपासून सागर कारंडे ''चला हवा येऊ द्या'मध्ये दिसत नसून सागर कांरडेनं या शोमधून एक्सिट घेतली आहे. त्यामुळे पोस्टमनच्या रोलसाठी एकप्रकारे पोकळी निर्माण झालेली असताना काही दिवसांपुर्वीच्या चला हवा येऊ द्याच्या एपिसोडमध्ये अभिनेत्री श्रेया बुगडेनं महिला पोस्टमनचा (Shreya Bugde as Postman) रोल साकारत तेच सादरीकरण प्रेक्षकांसमोर आणले होते. त्यानं पुन्हा प्रेक्षकांना सागर कारंडेची आठवण झाली खरी आणि त्याचसोबत हे सेगमेंट परत नव्यानं सुरू झाल्यानं चला हवा येऊ द्या प्रेक्षकांना आनंद झालाही पण... श्रेया बुगडेला पाहून मात्र अनेकांची नाराजी व्यक्त होताना दिसते आहे. सोशल मीडियावर श्रेया बुगडे ट्रोल (Shreya Bugde Trolled) होते आहे. 


प्रेक्षकांची नाराजी 


चला हवा येऊ द्या ही सिरियल अनेकांच्या आवडीची आहे. महाराष्ट्रातलाच काय तर जगाभरातला असा एकही मराठी प्रेक्षक नाही जे चला हवा येऊ द्या या मालिकेचे फॅन्स नाहीत. या मालिकेनं गेली नऊ वर्षे प्रेक्षकांचे प्रेम कायम ठेवले आहे. परंतु सोशल मीडियावरून मात्र कलाकार हे अनेकदा ट्रोल होत असतात त्याचप्रमाणे चला हवा येऊ द्याच्या कलाकारांनाही हे ट्रोलिंग चुकलेले नाही. याआधी निलेश साबळे, कुशल बद्रिके, भाऊ कदम यांना (Bhau Kadam) ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. त्यात सागरची जागा आता श्रेयानं घेतल्यानं येथेही नेटकऱ्यांनी या बदलावरून संताप व्यक्त केला आहे. 


श्रेया बुगडे ट्रोल 


सागरची जागा आता श्रेयानं घेतली आहे. मागच्या आठवड्याच्या भागात श्रेयानं पत्रवाचन केलं. तेव्हा तिनं हा व्हिडीओ आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केला परंतु त्याच्याखाली आलेल्या कमेंट्स पाहून मात्र हा बदल प्रेक्षकांना रूचला नाहीये. सागर आपण हा शो सोडला असल्याची अधिकृत माहिती तरी दिलेली नाही.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


परंतु सागरच उत्तम होता, सागरची आठवण येते अशा अनेक कमेंट्स चाहते या (Shreya Bugde Viral Video) व्हिडीओ खाली करताना दिसत आहेत.