मुंबई : झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे घराघरात पोहचलेला अभिनेता विनीत बोंडे नुकताच विवाहबंधनात अडकला. विनीतच्या मुळ गावी औरंगाबादला कुटुंबियांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. सोलापूरच्या सोनम पवारसोबत विनीत विवाहबद्ध झाला.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी विनीत आणि सोनमच्या साखरपुड्याचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. विनीत आणि सोनमचा हे अरेन्ज मॅरेज असून सोनम सध्या पुण्यात नर्सिंगचे शिक्षण घेत आहे. त्यामुळे परिक्षा झाल्यानंतर विनीत सोनमसह अंदमान निकोबारला हनिमूनसाठी जाणार असल्याचे त्याने एका मुलाखतीत सांगितले.