मुंबई :  भाषा जरी मराठी असली तरी प्रत्येक जिल्ह्यात, गावात मराठी भाषा बोलण्याची पद्धत मात्र वेगळी. आपणं मुंबईत जरी राहत असतो, तरी आपल्या भाषेत आपल्या गावच्या भाषेचा लहेजा असतोच. याबद्दलचा प्रश्न थुकरटवाडीतील सगर कारंडेला देखील विचारण्यात आला. तेव्हा सागर म्हणाला, शाळेला सुट्टी लागली की मी गावी जायचो. त्यानंतर पुन्हा मुंबईत आल्यावर माझी तिचं भाषा असायची... सागर कऱ्हाडचा असल्यामुळे त्याच्या भाषेत पश्चिम महाराष्ट्राचा लहेजा जाणवतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर भारत गणेशपुरे म्हणाला, सागरचा जन्म जरी मुंबईत झाला असला तरी त्याचे आई-वडील सगळे त्या भाषेतच बोलत असतात. त्यामुळे जन्म जरी मुंबईत झाला असला तरी आपली  भाषा गावच्या वातावणाभोवती फिरत असते. चला हवा येऊ द्या या झी मराठीवरील मालिकेमधील सागरच्या भुमिकेने सर्वांच्या मनात घर केलं आहे. 



चला हवा येऊ द्या या झी मराठीवरील मालिकेने अवघ्या मराठी माणसांची मनं जिंकली आहेत, अशा माणसांनी ज्यांना महाराष्ट्राला भरभरुन हसवलं, डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसवलं अशा सर्व कलाकारांशी बातचित केली आहे, झी २४ तासचे संपादक निलेश खरे यांनी. कलाकारांनी त्यांच्या आयुष्यातील काही भन्नाट किस्से सांगितले आहेत.