Chandrayaan 3 based Movie Akshay Kumar : काल पासून सोशल मीडियावर फक्त एकाच गोष्टीची चर्चा आहे आणि ती म्हणजे 'चांद्रयान 3'. 'चांद्रयान 3' च्या विक्रम लॅंडरनं 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅन्ड करत भारताच्या इतिहासात एक नवा विक्रम जोडला आहे. त्यानिमित्तानं सगळ्याना फार आनंद झाला. एकीकडे संपूर्ण देश या मोहिमेचा आनंद साजरा करत असताना दुसरीकडे आता अशी चर्चा सुरु आहे की या मोहिमेवर आता एक नवीन चित्रपट येणार असल्याचे म्हटले जाते. असं म्हटलं जातं आहे की मिशन मंगल या चित्रपटाचे दिग्दर्शक जगन शक्ती हे 'चांद्रयान 3' च्या यशावर आता एक नवा चित्रपट घेऊन येणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगन शक्ती यांनी नुकतीच एका मुलाखतीत दिलेल्या त्यांच्या या चित्रपटाविषयी सांगितले. ते म्हणाले की ते या संधीला हातातून जाऊ देणार नाहीत. इतकंच नाही तर या चित्रपटाविषयी आणखी पुढे माहित देत असताना ते म्हणाले की ‘चांद्रयान 3’ मोहीमेवर बनणाऱ्या चित्रपटात ‘मिशन मंगल’मधील कलाकार पुन्हा एकदा यावेळी पाहायला मिळू शकतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ते कलाकार कोणते आहेत. तर चला एकदा त्यांची नावं देखील जाणून घेऊया. ‘मिशन मंगल’ मध्ये अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, क्रिती कुल्हारी या प्रमाणे इतर कलाकार देखील होते. या कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यामुळे आता याच कलाकारांना ‘चांद्रयान 3’ मध्ये पाहण्याची शक्यता आहे. 



हेही वाचा : 'सेक्शुअली इंटीमेट सीन्स, आई-बहिणीवरून शिवीगाळ...', 'गदर 2' फेम अमीषा पटेल ट्रोल


सगळ्यात आधी जर ‘मिशन मंगल’ विषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट मंगळ ग्रहावर असलेल्या भारताच्या मोहिमेवर आधारीत आहे. ‘मिशन मंगल’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगला गाजला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 290 कोटींचा गल्ला केला होता. त्यात आता ‘चांद्रयान 3’ या मोहिमेची प्रेक्षकांमध्ये असलेली क्रेझ पाहता आता प्रेक्षकांना आशा आहे की प्रेक्षकांना हा चित्रपट येणार या बातमीनंच खूप आनंद झाला असेल आणि इतकंच नाही तर त्यासोबतच चित्रपट कधी येणार याच्या उत्सुकता लागली असेल. दिग्दर्शक जगन शक्ती यांना त्यावर चित्रपट बनवण्याची संधी गमवायची नाही. हे आपल्याला इतक्यात कळलं आहे. तर दुसरीकडे सगळ्यां संधोशकांनी या मिशनसाठी म्हणजेच मोहिमेसाठी किती मेहनत केली असेल हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे.