Charu Asopa Rajeev Sen: राजीव सेन (Rajeev Sen) आणि चारू असोपा (Charu Asopa) या दोघांमध्ये होत असलेल्या भांडण्यामुळे ते दोघे लवकरच घटस्फोट घेणार आहे. अशा बातम्या काही दिवसांपासून चर्चे होत्या. पण बुधवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी दोघांनी एकत्र गणरायाचं स्वागत केलं. त्यांनी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर या दोघांमध्ये पॅचअप झाल्याची चर्चा रंगली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर खुद्द चारू असोपा आणि राजीव सेन यांनी सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये चारू आणि राजीव यांनी त्यांच्या नात्याशी संबंधित एवढा मोठा निर्णय उघड केला, ऐकून तुम्हाला आर्श्चय वाटणार आहे. (Charu Asopa and Rajeev Sen big decision after divorce you will be shocked to know)


''...यामुळे आता आम्ही हा निर्णय घेत आहोत''


चारू असोपा आणि राजीव सेन यांनी जियानासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिघेही खूप आनंदी दिसत आहेत. चारू असोपा यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे का, 'जोड्या या स्वर्गात बनतात पण त्या कशा चालवायच्या हे तुमच्यावर अवलंबून असतं. काही दिवसांपूर्वीच आम्ही तुम्हा सर्वांना आमच्या विभक्त झाल्याची माहिती दिली होती कारण आमचं लग्नाचं नातं संपलं होतं. आम्ही शेवटच्या टोकाला पोहोचलो होतो. त्यावेळी घटस्फोट हा एकच पर्याय आमच्यासमोर राहिला होता.



'पण आता आम्ही आमचं लग्न नातं पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. हे जाहीर करताना आम्ही आनंद आहोत. आम्हा दोघांना जियाना नावाची एक सुंदर मुलगी आहे आणि तिच्यासाठी आम्हाला एक चांगले पालक व्हायचं आहे. तिचे संगोपन आणि तिचा आनंद हे आमचं पहिलं काम असणार आहे. म्ही आमच्या सर्व चाहत्यांचे आभार मानू इच्छितो की त्यांनी नेहमी आम्हाला जोडपे म्हणून पाठिंबा दिला आणि कधीही हार मानली नाही.'