मुंबई : टीव्ही अभिनेत्री चारू असोपा तिच्या कामापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. चारूने बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीवसोबत लग्न केलं. लग्नानंतर वर्षभरातच दोघांमध्ये भांडण सुरू झालं आणि त्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघं एकत्र दिसत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चारू असोपाने कुटुंबासह गणेश चतुर्थी साजरी केली
चारू असोपाने  तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती राजीव सेन आणि मुलगी जियानासोबत गणेश चतुर्थी साजरी करताना दिसत आहे. चारू आणि राजीव सेन यांनी गणपतीची पूजा केल्याचं तुम्ही या फोटोंमध्ये पाहू शकता. एका फोटोमध्ये तो आपल्या मुलीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. हे फोटो पाहून चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. चारूच्या पोस्टवर कमेंट करताना एका यूजरनं लिहिलं आहे की, 'तुमच्या कुटुंबाला पाहून खूप आनंद झाला.


कमेंट करत आणखी एका यूजरने लिहिलंय की, 'लव्हली'. दोघांना एकत्र पाहून भरभरून प्रेम मिळवणारे हजारो यूजर्स आहेत. अलीकडेच राजीव सेनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये दोघंही खूप आनंदी दिसत होते. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये  गुलाबाचं फूलं इमोजीद्वारे शेअर केलं होतं, त्यानंतर दोघं पुन्हा एकत्र आले की काय अशी अटकळ चाहत्यांनी लावली आणि त्यांनी घटस्फोटाचा निर्णय बदलला आहे.



वास्तविक, चारू असोपाने तिच्या एका मुलाखतीत सांगितलं की, 'प्रत्येकाला माहित आहे की, आमचं लग्न झाल्यापासून, गेल्या तीन वर्षांपासून आमच्या लग्नात अडचण येत आहे. मी त्याला एक नव्हेतर बऱ्याच संधी दिल्या. प्रथम तो माझ्यासाठी आणि नंतर आमच्या मुलीसाठी होता. 'मला वेगळं व्हायचं आहे. कारण माझी मुलगी अपमानजनक वातावरणात वाढू इच्छित नाही.