मुंबई : सुष्मिता सेनची वहिनी आणि टीव्ही अभिनेत्री चारू असोपा हिने अलीकडेच प्रसूतीनंतर तिला येणाऱ्या अडचणींबद्दल सांगितलं आहे. तिने सांगितलं की, ती कशी अस्वस्थ असायची आणि तिला एंग्जायटी अटॅक कसे  येऊ लागले. तिचा त्रास इतका वाढला होता की, तिला तिच्या मुलीला दूधही पाजता येत नव्हतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चारूला दूधही पाजता येत नव्हतं
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चारू असोपाने तिच्या गर्भधारणा आणि मुलाशी संबंधित प्रत्येक मुद्द्यावर बोलली आहे. चारू असोपा म्हणाली की, प्रसूतीनंतर लगेचच ती आपल्या बाळाला स्तनपान करू शकली नाही. चारू असोपाने सांगितलं की, तिची प्रसूती सी-सेक्शनद्वारे झाली होती. त्यामुळे ती आपल्या बाळाला दूध पाजू शकली नाही आणि हे पाहून ती रडायची.


एंग्जायटी अटॅक येऊ लागले
चारूने सांगितलं की, प्रसूतीनंतर तिच्या बाळाला आईचं दूध मिळालं नाही तेव्हा ती अस्वस्थ झाली. आईचं दूध तीन-चार दिवसांत येईल. असं लोकांनी तिला सांगितलं. पण, मला सुमारे 6-7 दिवस लागले. अशा स्थितीत डॉक्टर मला कोणत्याही परिस्थितीत ताण घेण्यास सांगत नसताना मी अस्वस्थ आणि तणावग्रस्त झाले. तणावावर नियंत्रण ठेवता येत नसल्यामुळे, तिला दररोज एंग्जायटी अटॅक येऊ लागले. चारू असोपा म्हणाल्या, 'काही दिवसांनी मी तिला स्तनपान करायला सुरुवात केली आणि सगळं काही ठीक झालं.