मुंबई : सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि वहिनी चारू असोपा यांच्यातील नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं आहे. दोघंही एकमेकांवर सतत आरोप-प्रत्याआरोप करत आहेत. या दोघांमधईल प्रकरण इतकं बिघडलं आहे की, दोघांनी घटस्फोटासाठी कायदेशीर प्रक्रियेचाही सहारा घेतला आहे. दरम्यान, चारू असोपाला अशी गुडन्यूज मिळाली आहे की, ज्यानंतर अभिनेत्रीच्या आनंदाला पारावार उरला नाही. विशेष म्हणजे चारूनेही हा आनंद आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. अभिनेत्रीची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कठीण काळात चांगली बातमी मिळाली
गेल्या काही दिवसांपासून चारू असोपा तिच्या वैयक्तिक आयुष्यातील कठीण टप्प्यातून जात आहे. पण अभिनेत्री कशीतरी स्वतःची काळजी घेत सर्व गोष्टी सांभाळत आहे. त्याचबरोबर, आता अभिनेत्रीला अशी आनंदाची बातमी मिळाली आहे की, ती आपला आनंद कोणापासून लपवू शकत नाही. याचा पुरावा म्हणजे अभिनेत्रीची इन्स्टा स्टोरी.


स्वत: केला खुलासा
चारू असोपाने इन्स्टा स्टोरीवर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. हा स्क्रीनशॉट चारूच्या इन्स्टा पेजचा आहे. जिचे फॉलोअर्स आता 1 मिलियन झाले आहेत. पेजचा हाच स्क्रीनशॉट अभिनेत्रीने इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे. ज्यावर एका चाहत्याने कॅप्शनमध्ये लिहिलं 'चारू मॅडम तुमचं अभिनंदन..1 मिलियन... खूप पुढे जा आणि नेहमी खूप चमकत राहा.'



घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चारू असोपा सतत चर्चेत असते. अभिनेत्री अलीकडेच एका फॅशन शोमध्ये गेली होती. जिथे तिने वधूच्या ड्रेसमध्ये रॅम्प वॉक केला होता. अभिनेत्रीने वधूच्या ड्रेसचा लूकही सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती सुंदर दिसत आहे. या व्हिडीओवर तिचे चाहतेही जोरदार कमेंट करत आहेत.