Charu Asopa Rajeev Sen Divorce: झगमगत्या विश्वात सर्वात जास्त चर्चेत असणारा विषय म्हणजे सेलिब्रिटींचे प्रेमसंबंध, लग्न आणि घटस्फोट. पण आता चर्चा प्रेमसंबंध आणि लग्नाची नाही तर, प्रसिद्ध सेलिब्रिटी कपलच्या घटस्फोटाबद्दल रंगत आहे. हे सेलिब्रिटी कपल दुसरं तिसरं कोणी नसून अभिनेत्री चोरु असोपा (Charu Asopa) आण राजीव सेन (Rajeev Sen) आहेत. काही दिवसांपूर्वी चारु - राजीव यांच्यामध्ये सुरु असलेले वाद कमी झाल्याचं चित्र होतं. पण आता चारुने केलेल्या वक्तव्यामुळे दोघांचं नातं अंतिम टप्प्यांवर आहे, असं म्हणायला हरकत नाही.  (Charu Asopa Rajeev Sen Divorce)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चारु प्रेग्नेंसी दरम्यान मुंबईत आल्यानंतर
एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, 'गेल्या वर्षी मी 8 महिन्याची गरोदर असताना काही दिवसांसाठी माहेरी गेली. त्यानंतर पुन्हा मुंबईत आली. तेव्हा राजीव सकाळी 11 वाजता जीमला जातोय असं सांगून घरा बाहेर जायचा आणि रात्री 9 नंतर घरी यायचा...'  (charu asopa on her


राजीव आणि चारुच्या नात्यातील वाद
'मी त्याला कायम विचारायची एवढा उशीर का झाला? तेव्हा तो ट्राफिक असल्याचं सांगायचा. त्याची प्रत्येक गोष्ट मी ऐकली. कारण मी राजीववर प्रचंड प्रेम करते. एकदा राजीव मला न सांगता दिल्लीला निघून गेला.' ( charu rajeev troubled marriage)


राजीवला दिली नवी संधी पण... 
पुढे अभिनेत्री म्हणाली, 'राजीव काहीही न सांगता गेल्यामुळे मी त्रस्त होते. तेव्हा मला त्याच्या बॅगेतून असं काही सापडलं, तेव्हा मला कळालं की राजीव माझी फसवणूक करत आहे. तेव्हा मी सगळं काही कुटुंबाला सांगितलं. अनेकदा त्याला नवीन सुरुवात करण्याची संधी देखील दिली. पण लग्नानंतर तीन वर्ष एक दिवस सर्व काही ठिक होईल या प्रतीक्षेतच गेले.' असं देखील अभिनेत्री म्हणाली. (charu asopa interview)


सांगायचं झालं तर, चारु आणि राजीवने 2019 साली कुटुंबाच्या उपस्थितीत मोठ्या थाटात लग्न केलं. चारु-राजीवला एक मुलगी देखील आहे. आता होत असलेल्या त्यांच्या भांडणांमुळे सर्वत्र त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत आहेत. ( charu rajeev daughter)