मुंबई : प्रत्येक कलेच बी हे लहानपणीच रूजवलं जातं. आणि यासाठी महत्वाच्या ठरतात त्या स्पर्धा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लहान मुलांच्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव देण्यासाठी हक्काचं व्यासपीठ असणं गरजेचं आहे. दामोदर सभागृहात 
बालनाट्य स्पर्धेचं आयोजन गेल्या कित्येक वर्षांपासून होत आहे.  यंदाचं वर्ष हे ३३ वे वर्ष आहे. या वर्षी एकूण २२ बालनाट्य स्पर्धेत सहभागी होत आहे. परळच्या दामोदर हॉलमध्ये ६,७ आणि ८ डिसेंबरला ही बालनाट्य स्पर्धा रंगणार आहे. 


स्पर्धेचा खरा हेतू? 


प्रा. मधूकर तोरमडलकर यांच्या स्मृतीप्रत्यर्थ ही स्पर्धा दरवर्षी घेतली जाते. संपत चाललेली बालनाट्य संस्कृती पुन्हा जीवंत व्हावी या उद्देशाने ही स्पर्धा घेतली जाते. गेली ३३ वर्षे सुरू असलेल्या या स्पर्धेने अनेक अभिनेते या सिनेसृष्टीला दिले आहेत. मुख्य म्हणजे मुंबई आणि उपनगरातील शाळांमधून या स्पर्धेत बालनाट्य सहभागी होतात. यावेळी दररोज ८ बालनाट्यांची पर्वणीच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. 


आयोजक, अशोक परब : 


गेले ३३ वर्षे बालनाट्य स्पर्धेचं आयोजन अविरतपणे सुरू आहे. लहान मुलांमध्ये अभिनय दडलेला असतो. पण 
त्यांना योग्य व्यासपीठ मिळत नाही. पूर्वी सुट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बालनाट्य शिबिरांचे आयोजन केलं जायचं. पण आता हळूहळू ही संस्कृती संपत चालली आहे.  या आधी आम्ही अगदी नाममात्र तिकिट या स्पर्धेसाठी लावायचो. मात्र आता पूर्णपणे मोफत बालनाट्य स्पर्धा भरवली जाते.