मुंबई : संपूर्ण जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसचा धोका चीनमध्ये शमल्याचं चित्र समोर येत आहे. चीनच्या वुहानमध्ये कोरोना या धोकादायक विषाणूचा उदय झाला होता. तेथे देखील कोरोनामुळे हजारो रुग्णांचा मृत्यू झाला. पण तरी देखील चीनला मात्र जाग आलेली नाही. त्याठिकाणी पुन्हा मांस विक्रीची सुरूवात झाली आहे. चीनच्या या बेजबाबदार वृत्तीला बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने फटकारले आहे. संपूर्ण जगाला माहित आहे की कोरोनाचा केंद्र स्थान चीन आहे आणि या आजाराची सुरूवात प्राण्यामुळे झाली आहे. त्यानंतर रवीना ट्विटरच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ती म्हणाली 'चीनमध्ये वटवाघूळ, कुत्रे, मांजर, बेडूक या प्राण्यांची विक्री कोणतीही भीती न बाळगता सुरू करण्यात आली आहे. पण आता या ठिकाणी फोटो काढण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. त्यासाठी या बाजारात एक पोलीस देखील तैनाक करण्यात आला आहे.' असं ती म्हणाली त्याचप्रमाणे प्राण्याच्या अनुशंगाने चीन हा देश अत्यंत निर्दयी देश असल्याचं सांगत तिने आपला राग व्यक्त केला. 



कोरोना व्हायरसचा फैलाव झाल्यानंतर रवीनाचे या धोकादायक विषाणू संदर्भातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेणला होता. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने लोकांना लॉकडाऊनचे महत्त्व समजावून सांगितले होते. 


कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगाचे मोठे नुकसान झाले आहे. या धोकादायक विषाणूची लागण  संपूर्ण जगात तब्बल ७ लाख ८५ हजार ७७७ जणांना झाली आहे. तर ३७ हजार ८१५ जाणांचा या व्हायरसने बळी घेतला आहे. दिलासादायक बातमी म्हणजे १ लाख ६५ हजार ६०७ कोरोना बाधित रुग्णांची या आजारातून सुखरूप सुटका झाली आहे.