Maharaja movie 2024: मागील काही वर्षांपासून दाक्षिणात्य चित्रपटाचं गारुड देशाबरोबरच परदेशातही दिसून येत आहे. सध्या विजय सेतुपतीचा (Vijay Sethupathi) तमिळ ॲक्शन थ्रिलर ‘महाराजा’ चीनमध्ये बक्कळ कमाई करत आहे. या चित्रपटाने भारतासहित चिनी प्रेक्षकांची सुद्धा मने जिंकली. विजय सेतुपतीचा तमिळ चित्रपट 'महाराजा' गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चिनी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. सध्या सोशल मीडियावर चीनमधील एका व्हिडिओमध्ये व्हायरल झाला आहे. यामध्ये चिनी प्रेक्षक थिएटरमध्ये हा चित्रपट पाहताना भावूक झाल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'एक्स'वरील (ट्विटर) गब्बर या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, यामध्ये त्याने लिहिले आहे की, "भारतीय वडील-मुलीवर आधारित चित्रपट चीनमध्ये नेहमीच चांगले प्रदर्शन करतात. दंगल, सिक्रेट सुपरस्टार आणि आता महाराजा."
 



महाराजा हा गेल्या पाच वर्षांतील चीनमधील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. आता हा चित्रपट 100 कोटी रुपयांच्या क्लबमध्ये पोहोचणार आहे. चीनमधील भारतीय दूतावासाच्या स्पिकर 'यू जिंग' यांनी X वर पोस्ट शेअर करत लिहिले, "महाराजा' हा 2018 नंतरचा चीनमधील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला असून त्याने आत्तापर्यंत 91.55 कोटी रुपयांचा आकडा गाठला आहे. अभिनंदन!"

विजय सेतुपतीच्या महाराजा शिवाय, आमिर खान यांचे 'दंगल' आणि 'सिक्रेट सुपरस्टार', आयुष्मान खुरानाचा 'अंधाधुन' आणि राणी मुखर्जीचा 'हिचकी' हे चित्रपटही चीनमध्ये खूप गाजले होते. चित्रपटाच्या यशाच्या निमित्ताने केरळमध्ये मिडियाशी बोलताना विजय सेतुपती म्हणाला, "हा चित्रपट तामिळनाडूमध्ये चांगला चालेल असे आम्हाला वाटले होते. परंतु राज्याबाहेरही मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. प्रेक्षकांनी चित्रपटातील प्रत्येक अभिनेता आणि तंत्रज्ञावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. मी काय बोलावे हेच समजत नाही!"


हे ही वाचा : मंदिरात गेल्याने सारा अली खान ट्रोल! श्रीशैलमच्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं पण...


या चित्रपटाचे दिग्दर्शक निथिलन समितान आहेत. विजय सेतुपतीसोबत 'महाराजा'मध्ये अनुराग कश्यप, ममता मोहनदास, नट्टी सुब्रमणियम, अभिरामी गोपिकुमार, दिव्या भारती, सिंगमपुली, अरुळदोस, मुनिशकांथ, सचना नमीदास, मणीकंदन आणि भारथीराजा यांसारख्या दिग्गजांचा देखील दमदार अभिनय पहायला मिळाला.