मुंबई : कोरोना व्हायरस या महामारीचा सामान्यांवर खूप मोठा परिणाम होत आहे. या खतरनाक व्हायरसमुळे दिवसभरात हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. तसेच अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरं जाव लागलं. कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. यामुळे अनेकांनी आपली नोकरी गमावली आहे. यामध्ये सिनेसृष्टीत काम करणाऱ्या छोट्या कलाकारांचा आणि कामगारांचा देखील समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दरम्यान साऊथ सिनेमातील लोकप्रिय आणि वरिष्ठ अभिनेत्री पावला श्यामला आर्थिक परिस्थितीला तोंड देत आहेत. कोरोनामुळे सिनेसृष्टीवर खूप मोठा परिणाम झाला आहे. ज्यामुळे सामान्य जीवन जगणे देखील कठीण झाले आहे. अशातच 70 वर्षीय पावला श्यामला यांना आपल्या मुलीच्या उपचाराकरता दर महिना 10 हजार रुपये खर्च करावे लागतात. काम नसल्यामुळे आपलं घर चालवणं कठीण झालं आहे. आणि आर्थिक तंगी जाणवत आहे. 


अशा परिस्थितीत त्यांनी आपले पुरस्कार विकून आर्थिक चणचण भागवली आहे. पावला श्यामला म्हणाल्या, “गरिबी तर मी आधीपासून पाहिली आहे, पण अशी परिस्थिती मी पहिल्यांदा पाहत आहे. आता या गरिबीची भिती वाटू लागली आहे. मुलीच्या पायावर जखम झाली आहे. सोबत तिला टीबी देखील झाला आहे. तिच्यासाठी प्रत्येक महिन्याला १० हजार रूपये खर्च करावे लागतात. ही गरज भागवण्यासाठी मी यापूर्वी अनेकदा मला मिळालेले अवॉर्ड्स देखील विकले आहेत. करोना काळात माझ्या मदतीसाठी कुणीच पुढे येत नाही. या काळात ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन देखील मिळत नाही.” अशी खंत व्यक्त केली. 



मात्र अशा परिस्थितीत साऊथचे सुपरस्टार चिरंजीवी मदतीसाठी पुढे आले आहे. चिरंजीवीने पावला श्यामला 1,01,500 रुपयांहून अधिक मदत केली आहे. ही माहिती चिरंजीवी यांच्या मॅनेजरने दिली आहे.  सुपरस्टार चिंरजीवी यांचे प्रवक्ते सुरेश कोंडेती यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर सुपरस्टार चिंरजीवी यांचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये चिरंजीवी स्वतः त्यांच्या हाताने पावला श्यामला यांना 1,01,500 रुपयांचा चेक देताना दिसून येत आहेत.