Chrisann Pereira  Arrested : 'सडक 2' आणि 'बाटला हाऊस' फेम अभिनेत्री क्रिसन परेराला (Chrisann Pereira) संयुक्त अरब अमिरातीमध्ये अटक करण्यात आली आहे. क्रिसनला अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. क्रिसनला अटक केल्यानंतर शारजाह मध्यवर्ती कारागृहात कैद आहे. तुम्हाला प्रश्न असेल की ही माहिती कशी समोर आली असेल. तर भारतीय दूतावासांनी क्रिसनच्या अटकेची माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली आहे. तर तिच्या कुटुंबानं ती आरोपी नसून पीडित असल्याचं म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदुस्तान टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, क्रिसनच्या कुटुंबाचं म्हणणे आहे की यात त्यांच्या मुलीला फसवण्यात आलं आहे. तर क्रिसनचा भाऊ केव्हिन म्हणाला, 'आम्ही गेल्या दोन आठवड्यांपासून इमोशन्ल छळाचा सामना करत आहोत. माझी बहीण निर्दोष आहे आणि तिला ड्रग्ज रॅकेटमध्ये अडकवण्यात आलं आहे.' तिच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, क्रिसन जेव्हापासून शारजाह विमानतळावर उतरली तेव्हापासून ते तिच्याशी बोलू शकले नाहीत. 



क्रिसनच्या भावानं पुढे सांगितलं की इंडियन कॉन्स्यूलेटनं त्यांना 72 तासांनंतर माहिती दिली की तिला अटक करण्यात आली आहे आणि इतकंच काय तर तिला शारजाह मध्यवर्ती कारागृहात कैद करण्यात आलं आहे. तर क्रिसनला रवी नावाच्या व्यक्तीने फसवले. त्यानं सगळ्यात आधी कृष्णाची आई प्रेमिले परेरा यांच्याशी संपर्क साधला. रवी नावाच्या या व्यक्तीने सांगितले की तो एका इंटरनॅशनल वेब सीरिजसाठी कास्ट करत आहे. आईने रवीची ओळख कृष्णाशी करून दिली. काही भेटीनंतर दुबईत वेब सीरिजसाठी ऑडिशन होणार असल्याचे त्यानं सांगितले होते. तर तिच्या प्रवासाचे संपूर्ण बुकिंग रवीने केले होते. (Chrisann Pereira arrested in UAE) 



क्रिसनच्या आईने सांगितले की, दुबईला जाण्यापूर्वी रवीने क्रिसनला एक ट्रॉफी दिली. तो स्क्रिप्टचा भाग असल्याचे त्याने सांगितले. या ट्रॉफीमुळेच क्रिसनला विमानतळावर अधिकाऱ्यांनी पकडले तेव्हा त्यातून ड्रग्ज जप्त करण्यात आले. यानंतर 10 एप्रिल रोजी पोलिसांनी अभिनेत्रीवर ड्रग्ज तस्करीचे आरोप लावले. दरम्यान, रवी नावाची व्यक्ती सध्या बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.


हेही वाचा : बॉलिवूड अभिनेत्री Mahima Chaudhry च्या आईचं निधन!


क्रिसनच्या कुटुंबानं पुढे सांगितले की त्यांनी दुबईत तिच्यासाठी एक वकील नेमला आहे. कुटुंबानं पुढे सांगितलं की वकिलाची फी ही 13 लाख रुपये आहे आणि त्यांच्या मुलीला सुखरुप परत आणण्यासाठी घरदेखील गहाण ठेवायला तयार आहेत. कारण यासाठी दंड हा 20-40 लाख रुपये आहेत.