`टॉयलेटच्या पाण्यानं कॉफी बनवली तर डिटर्जंटनं...`, तुरुंगातून बाहेर आलेल्या Chrisann Pereira चा धक्कादायक खुलासा
Chrisann Pereira Letter After Coming From Jail : क्रिसन परेराला संयुक्त अरब अमिरातीमध्ये ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली होती, त्यानंतर खऱ्या गुन्हेगाराला पकडल्यानंतर तिची सुटका झाली आहे. आता क्रिसननं तिला तुरुंगात आलेला एप्सपिरियंस हा सोशल मीडियावर पोस्ट शेअर केला आहे.
Chrisann Pereira Letter After Coming From Jail : 'सडक 2' या चित्रपटातील अभिनेत्री क्रिसन परेराला (Chrisann Pereira) संयुक्त अरब अमिरातीमध्ये अटक करण्यात आली आहे. क्रिसनला अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली होती. तर अटक केल्यानंतर क्रिसनला शारजाह मध्यवर्ती कारागृहात कैद करण्यात आलं. तर क्रिसननं तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर तिथे तिचे दिवस कसे गेले या विषयी तिनं एक पत्रात लिहत सांगितले आहे. ते पत्र क्रिसनच्या या पत्राचा फोटो तिच्या भावानं सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.
क्रिसनच्या भावानं हे पत्र इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलं आहे. त्या पत्रात क्रिसनं म्हणाली, 'प्रिय योद्धा, तुरुंगात पेन आणि कागद शोधण्यासाठी मला चक्क तीन आठवडे आणि पाच दिवस लागले. डिटर्जंटने मी माझे केस धुतले आणि टॉयलेटच्या पाण्याचा वापर करून कॉफी बनवली. माझ्या महत्वाकांक्षेने मला येथे आणले असा विचार मी कधीकधी करायचे, त्यामुळे मला अश्रू अनावर झाले. मला कधीकधी आपले चित्रपट आणि टीव्हीवरील ओळखीचे चेहरे पाहून हसू येते. मला भारतीय असल्याचा आणि भारतीय चित्रपटसृष्टीशी संबंधित असल्याचा मला अभिमान वाटतो.'
हेही वाचा : Samantha ला अशा परिस्थितीत पाहून चाहत्यांना बसला धक्का!
पुढे पत्रात क्रिसन म्हणाली, या ‘मॉनस्टर्स’नं खेळलेल्या या घाणेरड्या खेळात मी फक्त एक प्यादा आहे. तुम्हीच खरे योद्धा आहात. खऱ्या गुन्हेगारांना अटक करणाऱ्यांचे मी आभार मानते. यावेळी क्रिसन ही तिच्या कुटुंबाचे, मित्रांचे आणि पोलिसांचे आभार मानत होती. त्यासोबत माझ्याविषयी लिहिणाऱ्या किंवा बोलणाऱ्या सगळ्यांचे मी आभार मानते. माझे आणि माझ्याप्रमाणे अशा प्रकरणात अडकलेल्या अनेक निष्पाप लोकांचे तुम्ही प्राण वाचवले यासाठी धन्यवाद. न्यायाचा नेहमीच विजय होतो. (Drugs Case)
क्रिसनच्या आईनं तिला अटक झाल्यानंतर केला होता खुलासा
क्रिसनच्या आईनं सांगितलं होतं की, दुबईला जाण्याआधी रवी नावाच्या एका व्यक्तीनं क्रिसनला एक ट्रॉफी दिली होती. त्यानं सांगितलं होतं की परदेशात त्याच्या एका प्रोजेक्टचं शूटिंग आहे. तर ट्रॉफी घेऊन जाणं हा स्क्रिप्टचा भाग असल्याचे त्याने क्रिसनला सांगितले होते. या ट्रॉफीमुळेच क्रिसनला विमानतळावर अधिकाऱ्यांनी पकडले आणि तेव्हा त्यातून ड्रग्ज जप्त करण्यात आले. तर इंडियन कॉन्स्यूलेटनं क्रिसनच्या कुटुंबाला तब्बल 72 तासांनी तिच्या अटकेची माहीती दिली होती. यानंतर 10 एप्रिल रोजी पोलिसांनी क्रिसनला ड्रग्ज तस्करीचे आरोप लावले. दरम्यान, पोलिसांनी रवीला अटक केली आहे.