CID Fame Vivek Mashru : 90 च्या दशकातील छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय मालिका म्हणून सीआईडी (CID) ओळखली जाते. या मालिकेनं तब्बल 21 वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या काळात फक्त तर ही मालिका 2018 मध्ये बंद झाली. या मालिकेतील प्रत्येक कलाकारानं आपल्या सगळ्यांच्या मनात वेगळीच छाप सोडली आहे. या 21 वर्षाच्या काळात अनेक कलाकार मालिकेत दिसले आणि सगळ्यांनीच प्रेक्षकांची मने जिंकली. याच मालिकेतील अभिनेता विवेक मशरु तर सगळ्यांच्या लक्षातच आहे. विवेक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. त्याचं चर्चेत असण्याचे कारण ही एक सोशल मीडिया पोस्ट आहे. पण विवेक मशरु आता काय करतो असा प्रश्न तुम्हालाही असेल ना? चला तर जाणून घेऊया विवे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर एक महिन्या आधी म्हणजेच 21 मे रोजी ट्विटवर एका नेटकऱ्यानं विवेक मशरुचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत त्यानं कॅप्शन दिलं होतं की "जर तुम्ही या व्यक्तीला ओळखता तर तुमचं बालपण हे खूप सुंदर होतं." तर त्याच्या बरोबर एका महिन्यानंतर विवेक मशरुनं हे ट्वीट रिटीव्ट करत "मी जे काही केलं आहे, त्यासाठी तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत होता. त्यासाठी तुमचे धन्यवाद. कारण हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी मी आभारी आहे. खूप प्रेम आणि आभार."



विवेक मशरुच्या करिअर विषयी बोलायचे झाले तर त्यानं अक्कड बक्कड बम्बे बो या मालिकेतून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर त्यानं सीआयडी या मालिकेत 2006 ते 2013 असे 6 वर्षे काम केले. त्यानंतर त्यानं मालिकेला रामराम केला. 2014 साली विवेकनं लग्न केलं. विवेक इन्स्टाग्रामवर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर त्याच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करताना दिसतो. पण त्याच्या पत्नीचे नाव काय आणि ती काय करते हे त्यानं कधीच सांगितलं नाही. विवेक त्याचं खासगी आयुष्य हे खासगीच ठेवतो. 



आता काय करत विवेक? 





हेही वााचा : "बॉलिवूड नव्या पिढीला सॉफ्ट पॉर्न शिकवतंय?" Lust Stories 2 चा ट्रेलर पाहून अभिनेत्याचा संतप्त सवाल


विवेकनं अभिनय क्षेत्रातून कधीच ब्रेक घेतला आहे. विवेक आता रोज ब्लॉग लिहितो. तो सध्या कर्नाटकच्या बेंगळुरु येथे आहे. तिथे तो  CMR यूनिव्हर्सिटीच्या DCCC (डिपार्टमेंट ऑफ कॉमन कोर करिकुलम) मध्ये प्रोफेसर आहे. या आधी विवेकनं अनेक शाळा आणि इंस्टीट्यूशन्समध्ये काम केले आहे. असं म्हटलं जाते की इंडस व्हॅली स्कूलचा मार्केटिंग डायरेक्टर देखील होता.