"बॉलिवूड नव्या पिढीला सॉफ्ट पॉर्न शिकवतंय?" Lust Stories 2 चा ट्रेलर पाहून अभिनेत्याचा संतप्त सवाल

Lust Stories 2 :  'लस्ट स्टोरीज 2' चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर प्रेक्षकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात एका अभिनेत्यानं बॉलिवूड नव्या पीढीला काय शिकवत आहे असा सवाल केला असून त्यावेळी त्यानं सॉफ्ट पॉर्नचा उल्लेख केला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर या ट्रेलरची चांगलीच चर्चा सुरु आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 23, 2023, 12:26 PM IST
"बॉलिवूड नव्या पिढीला सॉफ्ट पॉर्न शिकवतंय?" Lust Stories 2 चा ट्रेलर पाहून अभिनेत्याचा संतप्त सवाल title=
(Photo Credit : Social Media)

KRK on Lust Stories 2 : नेटफ्लिक्सवरील 'लस्ट स्टोरीज'च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहता. आता निर्माते दुसरा भाग घेऊन आले आहेत. 'लस्ट स्टोरीज 2' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचा हा बोल्ड ट्रेलर पाहुन प्रेक्षकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या चित्रपटात अभिनेत्री काजोल आणि तमन्ना भाटिया या दोघीही बोल्ड सीन करताना दिसणार आहेत. तर आता त्या ट्रेलरवर स्वत:ला चित्रपट समीक्षक असल्याचे सांगणाऱ्या कमाल राशिद खान म्हणजेच केआरकेन त्यावर टीका केली आहे. इतकंच काय तर त्याला सॉफ्ट पॉर्न देखील म्हटले आहे. 

'लस्ट स्टोरीज 2' मध्ये काजोल, तमन्ना भाटिया, विजय वर्मा, नीना गुप्ता, मृणाल ठाकुर, अमृता सुभाष, अंगद बेदी, कुमुद मिश्रा आणि तिलोत्तमा शोम यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट त्याच्या विविथ पटकथा, त्यातील बोल्ड सीन्समुळे चर्चेत आहे. या सगळ्यामुळे हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. केआरकेनं ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत या ट्रेलरवर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. "मी नुकताच नेटफ्लिक्सच्या 'लस्ट स्टोरीज 2' चा ट्रेलर पाहिला आणि मला धक्काच बसला. 55 वर्षांती काजोल आणि 35 वर्षांची तमन्ना... पण सेक्स करताना दिसत आहेत. बॉलिवूड नवीन पिढीला काय शिकवत आहे? आणि अनुराग ठाकुर काय करतोय? तो या सॉफ्ट पॉर्नला थांबवू शकत नाही. हे भयानक आहे." त्यानं केलेलं हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. 

दरम्यान, तमन्ना भाटिया गेल्या काही दिवसांपासून जी करदामध्ये दिलेल्या सेमी न्यूड सीनमुळे चर्चेत होती. त्यावेळी अनेकांनी तमन्नाची तुलना सनी लिओनीशी केली. तर अनेकांनी तमन्ना ही नवीन सनी लिओनी आहे असं अनेकांनी म्हटलं आहे. तमन्नाला अनेकांनी ट्रोल केलं आहे. तर तमन्नाचा ‘जी करदा’ हा चित्रपट 15 जुन रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. अनुरिमा शर्मा दिग्दर्शित, या चित्रपटात सुहेल नय्यर, सायन बॅनर्जी, आशिम गुलाटी, हुसैन दलाल आणि अन्या सिंग यांच्याही भूमिका आहेत. 

हेही वाचा : VIDEO : नारायण राणेंची खासदारकीही जाऊ शकते; 'खुपते तिथे गुप्ते' मध्ये संजय राऊतांच्या वक्तव्यानं एकच खळबळ

तमन्नाविषयी बोलायचं झालं तर ती गेल्या बऱ्याच काळापासून तिच्या आणि अभिनेता विजय वर्मासोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत होती. तमन्ना आणि विजय आता त्यांच्या रिलेशनशिपवर मोकळेपणानं वक्तव्य केलं आहे. तर हे बातमी ऐकल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना मात्र, प्रचंड आनंद झाला आहे.