Kulwinder Kaur Slapped Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला कानशिलात लगावल्या प्रकरणी सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. ज्या महिलेनं कंगनाला कानशिलात लगावली त्या CIFS ची कॉन्सेटबल आहे. तर त्या महिलेचं नाव हे कुलविंदर कौर असं आहे. कुलविंदर, कंगना रणौतच्या किसान विरोधी वक्तव्यावरुन नाराज होती. कंगनानं किसान आंदोलन सुरु असताना दिल्लीत आंदोलसाठी बसलेल्या महिलांना म्हटलं होतं की त्या 100-100 रुपये घेऊन तिथे बसल्या आहेत. त्यावरून कंगणाची बहीण रंगोलीनं कंगनावर हात उगारणाऱ्या या महिलेसोबत इतरांना देखील खलिस्तानी म्हटलं आहे. तर दुसरीकडे कुलविंदरला निलंबित करण्यात आलं आहे. पण एक अशी व्यक्ती आहे जी कंगनाला कानशिलात लगावण्यासाठी आता 1 लाख रुपये बक्षीस जाहिर केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगना रणौत प्रकरणानंतर सोशल मीडियावर दोन विभागात वाटलं आहे. काही लोक ही कंगनासोबत आहेत, तर काही लोक हे कुलविंदरचे समर्थन करत आहे. ट्विटरवर असे व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यात लोकं कुलविंदरला योग्य बोलत आहेत. तर घटनेनंतर एक व्हिडीओ समोर आला आहे की ज्यात कुलविंदर बोलत आहे की कंगनानं शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या वेळी 100-100 रुपये घेऊन तिथे बसल्या आहेत, असं म्हटलं होतं. काय कंगना तिथे बसू शकेल? त्यासोबत कुलविंदरनं सांगितलं की तिची आई तिथे बसली होती. 



आधीचं ट्विटर म्हणजेच आताच्या X अकाऊंटवरून एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत पंजाबचा एक बिझनेसमॅन, कुलविंदरला 1 लाख रुपये देण्याविषयी बोलताना दिसत आहे. तर कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की 'मोहालीचा बिझनेसमॅन शिवराज सिंग बैंसनं घोषणा केली आहे की ते चंडीगढ विमानतळावर खासदार कंगना रणौतला कानशिलात लगावणाऱ्या सीआयएसएफ कॉन्स्टेबल कुलविंदर कौरला 1 लाख रुपये बक्षीस देणार आहे.'


हेही वाचा : 'खलिस्तानी, तुमची हीच लायकी..'; CISF जवानानं कंगनाला कानशिलात लगावताच संतापली बहीण रंगोली


तर व्हिडीओत शिवराज पंजाबीमध्ये बोलताना दिसत आहे की 'चंडीगढ विमानतळावर सीआयएफएसमध्ये असलेली आमची बहीण कुलविंदर कौर, जिनं कंगना रणौतला कानशिलात लगावली मी त्या मुलीला पंजाबी आणि पंजाबिला वाचवण्यासाठी सलमान करते आणि तिला एक लाख रुपये बक्षीस म्हणून देईन.' 


दरम्यान, कंगनानं चंडीगढ विमातळावर झालेल्या घटनेनंतर सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला होता.