मुंबई : पोर्नफिल्म बनवल्याप्रकरणी बिझनेसमॅन राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. राज कुंद्रा आणि त्याचा आयटी प्रमुख रयान थोर्प या दोघांना 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान मुंबई क्राईम ब्रांचने शिल्पाच्या जुहूतील घरावर छापा टाकला. त्याचशिवाय शिल्पाची कसून चौकशीही करण्यात आली. यावेळी राज कुंद्रा निर्दोष असल्याचं शिल्पाचं म्हणणं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनएनआयने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या सूत्रांप्रमाणे, शिल्पा शेट्टीने क्राईम ब्रांचला दिलेल्या जबाबात राज कुंद्रा निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. पॉर्न कंटेट तयार करण्याच्या प्रक्रियेत राजचा कोणताही हात नसल्याचंही शिल्पाचं म्हणणं आहे.


शिल्पा शेट्टीने सांगितलंय की, संबंधित अॅप राज कुंद्राचं नसून त्याचा मेहुणा प्रदीप बक्षी याचं आहे. शिवाय या अॅपसंदर्भात सर्व काम देखील तेच पाहतात. माझा नवरा निर्दोष आहे.


दरम्यान आता शिल्पाच्या बॅंक अकाऊंटचीही तपासणी करण्यात येणार आहे. कारण काही काळ राजच्या कंपनीत शिल्पा डायरेक्टर म्हणून काम करत होती.  तर दुसरीकडे राजने त्याच्यावर लावण्यात आलेले सगळे आरोप खोटे असल्याचं सांगितलं आहे. 


दरम्यान 19 जुलै रोजी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावलं होतं. ही चौकशी सुमारे 2 तास चालली आणि त्यानंतर राज कुंद्राला रात्री अकरा वाजता अटक करण्यात आली. तर काल अभिनेत्री शिल्पा शेट्टीचीही कसून चौकशी करण्यात आली. राजला काल कोर्टात हजर केल्यानंतर अधिक चौकशीसाठी कोठडीत 27 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे.