मुंबई : ‘राम लीला’, ‘बाजीराव-मस्तानी’ आणि‘पद्मावत’ सारख्या सुप​रहिट सिनेमात संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali)  आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांनी एकत्र काम केलं आहे. मेकर आणि एक्ट्रेस या लोकप्रिय जोडीला भन्साळी पुन्हा एकदा अनुभवू इच्छित होते. याकरता त्यांनी दीपिकाशी संवाद साधला. मात्र मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, दीपिकाने ही ऑफर नाकारली आहे. यामुळे संजय लीला भन्साळी नाराज झाले असून त्यांच्यात कोल्ड वॉर सुरू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या माहितीनुसार, संजय लीला भन्साळी यांनी दीपिका पदुकोणला त्यांचा आगामी सिनेमा 'गंगुबाई काठियावाडी' करता आयटम नंबर करता विचारलं होतं. मात्र दीपिकाने स्पेशल परफॉर्मन्स देण्याकरता नकार दिला. 


त्यानंतर भन्साळी यांनी एका 'हीरा मंडी' या प्रोजेक्ट करता लीड अभिनेत्री म्हणून देखील विचारणा केली. या सिनेमाबाबतही दीपिकाने नकार दिला. यावरून हे कोल्ड वॉर सुरू झालंय. 


रिजेक्शनने नाराज झाले भन्साळी 


एका पाठोपाठ एक दोन प्रोजेक्ट करता दीपिकाने भन्साळी यांना नकार दिला. भन्साळी आणि दीपिका यांचं बॉन्डींग चांगल असूनही तिने नकार दिल्यामुळे भन्साळी नाराज झाले. दीपिकाकडून भन्साळींना ही अपेक्षा नव्हती. यानंतर दोघांमध्ये कोणतीच चर्चा झालेली नाही. 


"बैजू बावरा' सिनेमाच्या शुटिंगवर परिणाम 


संजय लीला भन्साळी, दीपिका पदुकोण, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट एकत्र या सिनेमात काम करत आहेत. या सिनेमाचं नाव 'बैजू बावरा' असं असून याचं शुटिंग सुरू होणार होतं. मात्र या दोघांच्या कोल्ड वॉरमुळे शुटिंगवर परिणाम झाला आहे.  मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या भन्साळी गंगुबाई सिनेमात व्यस्त आहेत. त्यामुळे ते दीपिकाशी संवाद साधत नाहीत.