मुंबई : भारती सिंह टीव्ही विश्वात सर्वात जास्त प्रसिद्ध कॉमेडियन आहे. सध्या भारती तिच्या शोच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. 'डान्स दिवाने' आणि 'द कपिल शर्मा' शोमध्ये मुख्य भूमिका बजावत आहे. भारती फक्त सेटवर आणि पडद्यावर प्रेक्षकांना हसवत नाही तर ती ऑफकॅमेरा देखील प्रचंड विनोदी आहे. आपल्या विनोदबुद्धीने तिने अनेकांना पोट धरून हसण्यास भाग पाडलं आहे. भारती कायम तिच्या जोक्समुळे चर्चेत असते. पण आता मात्र ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. भारतीने 2017 साली हर्ष लिंबाचियासोबत लग्न केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीच्या लग्नाला आता 4 वर्ष झाली. त्यामुळे तिला सतत आई कधी होणार प्रश्न विचारला जात आहे. भारती सिंह 'डान्स दिवाने'च्या शुटिंगनंतर व्हॅनिटी व्हॅनजवळ पोहोचते. तेव्हा जमलेले पापाराजी तिचे फोटो आणि व्हिडिओ कारण्यात व्यस्त होतात. तेव्हा भारती म्हणते, 'पाहात राहा 'डान्स दिवाने' आणि 'द कपिल शर्मा शो' रात्री 8 ते 9.30 पर्यंत....'  सध्या भारतीचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. 



पुढे एका फोटोग्राफरने भारतीला विचारलं, 'आई कधी होणा..?' या प्रश्नाचं उत्तर देताना भारती म्हणाली, 'आता तर सर्वांना बाळाची प्रतीक्षा आहे. त्यासाठी तुम्हा एकांत द्या. ' भरतीचं हे उत्तर ऐकून सर्वांना हसू आलं. सध्या भारतीची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.