Comedian Khyali Saharan Physical Abuse Case : लोकप्रिय स्टॅंड-अप कॉमेडियन (Stand-up Comedian) ख्याली सहारनवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. ख्याली सहारनवर 25 वर्षांच्या एका तरुणीनं बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. तर ख्यालीनं त्या मुलीवर हा आरोप जयपूरमधील हॉटेलमध्ये असलेल्या एका खोलीत केल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, ख्याली विरोधात गुरुवारी त्या तरुणीनं तक्रार दाखल केली आहे. ख्यालीला ‘द लाफ्टर चॅलेंज’ या लोकप्रिय शोमधून प्रसिद्धी मिळाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जयपुरमध्ये झालेल्या या घटनेविषयी सांगत ती तरुणी म्हणाली होती की ख्याली हा आप या पक्षाचा कार्यकर्ता होता. त्यानं तिला आणि तिच्या मैत्रिणीला नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. त्यानिमित्तानं चर्चा करण्यासाठी ख्यालीनं तिला हॉटेलमध्ये बोलावले. त्यानंतर ख्यालीनं तिच्यासोबत गैरवर्तन केले. हा संपूर्ण प्रकार हा मानसरोवर परिसरातील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. तेव्हा ख्याली हा मद्यधुंद अवस्थेत असून त्यानं तिच्यासोबत बलात्कार केल्याचे त्या तरुणीनं सांगितले. इतकंच काय तर त्यानं जबरदस्तीनं त्या दोन्ही तरुणींना मद्यपान करण्यास भाग पाडले.  


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ख्यालीने हॉटेलमध्ये दोन रुम बुक केल्या होत्या. एक स्वत:साठी आणि दुसरी या तरुणींसाठी. ख्याली स्वत: मद्यपान करत होता आणि त्याने तरुणींना देखील मद्यपान करण्यास भाग पाडले. त्यानंतर काही वेळात एक तरुणी तेथून निघून गेली आणि ख्यालीने दुसऱ्या तरुणीवर बलात्कार केला.


हेही वाचा : Shah Rukh Khan च्या चाहत्यांची प्रतिक्षा संपली; लवकरच Pathaan येणार 'या' OTT वर


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीगंगानगर येथील एक महिला मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होती. पण, नोकरीची गरज असल्याने दुसऱ्या महिलेच्या माध्यमातून ही महिला कॉमेडियनच्या संपर्कात आली.दरम्यान, आयपीसी कलम 376 अंतर्गत ख्यालीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी त्या तरुणीनं मंगळवारी कॉमेडियनविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती मानसरोवर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप यादव यांनी दिली.


'ग्रेट इंडियन चॅलेंज' (Great Indian Chalenge) सीजन 2 मध्ये ख्याली सहभागी झाला होता. तर त्यानं इतर काही लोकप्रिय कॉमेडियन्ससोबत कॉमेडीयन कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) मध्ये हजेरी लावली होती.