दिल्ली : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना आज दिल्ली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार जीममध्ये वर्कआउट करताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते ट्रेडमिलवरून खाली कोसळले. त्यांना दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे समोर येते आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता पण आता त्यांची प्रकृती सुधारते आहे. लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे परंतु पुढील 48 तास त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याची माहितीही समोर आली आहे. 


कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे बातमी कळताच त्यांच्या चाहत्यांमध्ये चितेंचे वातावरण पसरले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून प्रत्येकजण राजू श्रीवास्तव यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे. राजू श्रीवास्तव लवकर बरे व्हावेत अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. 


प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव हे उत्तर प्रदेश फिल्म डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्षही आहेत.