वीर दास या वादग्रस्त कॉमेडियनवर `अशी` वेळ का आली? जाणून घ्या संपुर्ण प्रकरण
आजकाल अनेक कलाकारांच्या बाबतीत काही ना काही गोष्टी या घडतच असतात.
मुंबईः आजकाल अनेक कलाकारांच्या बाबतीत काही ना काही गोष्टी या घडतच असतात त्यातून लोकप्रिय कलाकारांसोबत काही झालेच तर त्यांच्या चाहत्यांना काळजी लागून राहते, नाहीतर काही लोकं त्यांच्यावरही हसतात.
सध्या वीर दास या कलाकाराची फारशी तशी चर्चा नाही पण आज सकाळी तो एका वेगळ्याच पेचात पडला. त्यांच्या चाहत्यांना त्याने सोशल मीडियावरून माहिती दिली तेव्हा कुठे जाऊन त्याच्या बाबतीत नक्की काय घडले याची माहिती चाहत्यांना मिळाली.
वीर दास हा स्टॅण्डअप कॉमेडीयन आहे. पण आपल्या कलेसोबतच त्याच्यावर गंभीर गुन्हे देखील दाखल आहे. अनेकदा त्याने देशावरून विधानेही केली आहेत ज्यामुळे अनेकांचा त्याच्यावर रोष आहे. त्याच्यावर आत्तापर्यंत अनेक कॉन्ट्रोव्हर्सीझ सुरू असून त्याच्यावर अनेकांचे आरोप आहेत.
वीर दास सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. त्यामुळे आज सकाळीच त्याने एक ट्विट टाकले ज्यामुळे एकच खळबळ माजली. त्याने त्याच्या ट्विटमधून लिहिले आहे की The plane is moving! I’m so happy I could cry. I might just, my t shirt is soaked in sweat anyway. Maybe my tears are cooler than my sweat and can bring my body temperature down.
नुकतेच फ्लाइटने प्रवास करणाऱ्या कॉमेडीयन वीर दासला अनेक समस्यांना सामोरे जावं लागलं होतं. त्यानंतर त्याने त्याचा वाईट अनुभव सोशल मीडियावरून सांगितला. आपला अनुभव ट्विटरच्या माध्यमातून शेअर करताना त्याने सांगितले की, विमान प्रवासादरम्यान कर्मचाऱ्यांशी त्याचे वाद झाले कारण त्यांच्यासोबत विमानात असलेल्या इतर प्रवाशांना जवळपास पाच तास तिथेच अडकून राहावे लागले होते.
आपल्या ट्विटमध्ये वीर दास यांनी लिहिले की, आम्ही सगळे एअर इंडियाच्या विमानात पाच तास अडकलो आहोत. एअर इंडियाचे व्यवस्थापक लोकांना बसण्यास सांगत आहेत आणि प्रवासी ओरडत आहेत.
स्टँडअप कॉमेडियन वीर दासने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर स्वत:चा एक जुना व्हिडिओ शेअर केल्यामुळे चर्चेत आला होता, त्यानंतर त्याच्या व्हिडिओवरून गदारोळ झाला होता. त्यांनी आपल्या बोलण्याने लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप लोकांनी केला आहे.