मुंबई : अभिनयापेक्षा बोल्ड स्टाईल आणि ड्रेसिंग सेन्समुळे इलियाना डिक्रूझ नेहमी चर्चेत असते. अलीकडेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर असा एक सेल्फी शेअर केला आहे की, लोकं तिचा हा फोटो पुन्हा-पुन्हा पाहत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इलियाना कॅमेराच्या जवळ आली आणि...
इलियाना डिक्रूजने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये इलियाना बेडवर झोपलेली दिसत आहे. हा फोटो काढण्यासाठी इलियाना कॅमेऱ्याच्या अगदी जवळ आली आहे आणि हा फोटो तिने क्लिक केला आहे. हा फोटो पाहता, इलियानाने निळ्या रंगाची बिकिनी घातली आहे. या फोटोत घामाघूम इलियाना नो मेकअप लूकमध्ये दिसत आहे.


कॅप्शन चर्चेत
हा सेल्फी शेअर करत इलियानाने कॅप्शनमध्ये लिहीलंय की, 'मी कॉल मिस नाही करत. मी त्याला तेव्हा पर्यंत पाहत राहते जोपर्यंत तो थांबत नाही.' 



ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये शेअर केला फोटो
याआधी इलियानाचा ट्रान्सपरंट ड्रेसमधला फोटो खूप व्हायरल झाला होता. फोटोमध्ये इलियानाने पांढऱ्या रंगाचा ट्रान्सपरंट ड्रेस घातला होता. या फोटोच्या मागे समुद्र दिसत आहे. या सुंदर दृश्यासोबत अभिनेत्रीने हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिलं- 'बेस्ट बीच डेज आणि कॉकटेल.' अगदी काही वेळातच ईलियानाच्या या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता.