मुंबई : सब टीव्हीवरील लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये डॉ हंसराज हाथी म्हणजे कवी कुमार आझाद यांच काही दिवसांपूर्वी निधन झालं आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे सगळ्यांनाच धक्का बसला. या कार्यक्रमातील डॉ हाथी हे अतिशय लोकप्रिय आणि मजेशीर कॅरेक्टर आहे. कवी आझाद यांच्या निधनामुळे हे कॅरेक्टर कोण प्ले करणार अशी चर्चा रंगली असताना माहिती हाती आली आहे की, डॉ हाथी या कॅरेक्टरसाठीचा शोध पूर्ण झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आता या मालिकेत सगळे गणरायाच्या आगमनाची तयारी करत आहेत. असं असतानाच या गणपतीच्या दिवसात डॉ हाथी प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जातं आहे. गणेश चतुर्थीपासून निर्मल सोनी हे डॉ हाथीचं कॅरेक्टर साकारणार आहेत. निर्मल सोनी यांनी या अगोदर देखील डॉ हाथीचं कॅरेक्टर  साकारलं आहे. हा एपिसोड 13 सप्टेंबर म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी दाखवला जाणार आहे. 


शोमध्ये नव्या डॉ हाथी यांची एन्ट्री होणार आहे. शोचे प्रोड्यूसर असित मोदीने काही दिवसांपूर्वी सांगितलं की, डॉ हाथी हा अजूनही शोचा भाग आहे. त्या पात्राकरता नवीन कलाकाराची शोध सुरू आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, या शोमधूनच आझाद यांच घर चालत होतं. त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळे घरच्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. 'तारक मेहता' या शोने डॉ हाथी यांनी जेवढी लोकप्रियता मिळवून दिली तेवढेच पैसे देखील मिळवून दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आझाद एका दिवसाकरता शुटिंगचे 25 हजार रुपये आकारत असे. प्रत्येक दिवसानुसार कॉन्ट्रक्टनुसार हाथी एका महिन्यात जवळपास 7 लाख रुपये कमवत असे.