मुंबई : बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खान (Shah Rukh Khan) ने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात घर केलं. शाहरुखच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतातच नाही तर, साता समुद्रा पार देखील फार मोठी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयापासून दूर असलेला शाहरुख 'पठान' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. पण सिनेमा प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता (Shah Rukh Khan in pathan)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोठ्या ब्रेकनंतर बॉलीवूडच्या 'बादशाहला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत. शाहरुख 2019 मध्ये शेवटचा पडद्यावर दिसल्याने ही निराशा काळाबरोबर वाढत आहे. जगभरात शाहरुख खान  (Shah Rukh Khan) चे फॅन फॉलोअर्स किती आहेत याची ओळख करून देण्याची गरज नाही. शाहरुख खान दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) सोबत सिद्धार्थ आनंद  (Siddharth Anand) दिग्दर्शित 'पठाण' (Pathaan) या चित्रपटातून पुन्हा एकदा पडद्यावर परतत आहे. काहि दिवसांपुर्वी या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्याने समोर येताच धुमाकूळ घातला होता. दुबईच्या बुर्ज खलिफावर पठाण या सिनेमाचं पोस्टर झळकलं आहे. अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला शाहरुखच्या पठाणने दुबईमध्ये आपला झेंडा रोवल्याचं दिसतंय.


पठाणच्या ट्रेलरची सुरुवात जॉन अब्राहमपासून होते आणि जॉन अब्राहम हा दहशतवादी असून तो भारतावर मोठ्या हल्ल्याची योजना आखत असल्याचं समोर आलेंआहे. त्याला सांभाळण्यासाठी 'पठाण'ची गरज आहे आणि मगच शाहरुख खानची एन्ट्री होते. दीपिका पदुकोणही शाहरुख खानसोबत अॅक्शन करताना दिसणार आहे. शाहरुख एक सैनिक आहे. चाहत्यांना या चित्रपटाच्या अ‍ॅक्शनबाबत खूप आशा आहेत.


बॉलीवूडचा 'भाईजान' सलमान खानही शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटात कॅमिओ करणार असल्याची बातमी समोर येत होती. ट्रेलर रिलीज झाला असून शाहरुखला पाहण्यासाठी जेवढे चाहते उत्सुक होते तेवढीच उत्सुकता सलमानच्या भूमिकेबाबतही होते. मात्र ट्रेलरमध्ये सलमान खान कुठेही दिसत नाहीये.



ट्रेलरमध्ये शाहरुख खानचा लूक पाहून त्याचे चाहते खूश झाले आहेत. दीपिकाचा हॉटनेस, जॉन अब्राहमची अॅक्शन आणि विशाल-शेखरच्या जबरदस्त संगीताने बॉल रोलिंग सेट केलं आहे आणि 25 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणाऱ्या या चित्रपटासाठी चाहते उत्सुक असल्याचं दिसत आहेत.