मुंबई : 'गेम ऑफ थ्रोन्स' फेम अभिनेता क्रिस्तोफर हिव्ह्यू (Kristofer Hivju) कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेता टॉम हँक्स आणि पत्नी रीता विल्सन, ओल्गा कुरिलेन्कोने नंतर आता क्रिस्तोफर हिव्ह्यू देखील कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. क्रिस्तोफर हिव्ह्यूने त्याला कोरोनाची लागण झाल्याची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आज मी कोरोना व्हायरसची चाचणी केली आणि ती  पॉझिटिव्ह आली. मी आणि माझ्या कुटुंबाचं घरातच विलगीकरण करण्यात आलं आहे. आमची प्रकृती आता स्थिर आहे. मला फक्त सर्दी झाल्यांचं निष्पन्न झालं आहे. पण अनेक लोकांसाठी हा व्हायरस घातक ठरला आहे.'



त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन क्रिस्तोफर हिव्ह्यूने केले आहे. जगभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. चीनच्या वुहानमधून पूर्ण जगात पसरलेल्या कोरोनाव्हायरसमुळे जगभरातील १लाख ७० हजार ७४० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 


तर महाराष्ट्रात आज कोरोनामुळे पहिला बळी गेला. मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात या रुग्णावर उपचार सुरू होते. दुबईतून आलेला हा रुग्ण ६४ वर्षांचा वृद्ध होता.