मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक रीमेक, बायोपिक साकारण्यात येतात शिवाय एखाद्या पुस्तकावर किंवा कादंबरीवर सिनेमे तयार करण्यात येतात. त्याचप्रमाणे अनेक वास्तवदर्शी सिनेमे देखील प्रेक्षकांच्या भेटीला येतात. सध्या कोरोना व्हायरसचं सावट संपूर्ण जगावर आहे. कोरोना व्हायरसचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. करोना विषाणूचा फटका मनोरंजन विश्वालाही बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यात महत्त्वाचं म्हणजे आताच्या गंभीर परिस्थितीवर सिनेमाचे शीर्षक नोंदवण्यासाठी निर्मात्यांमध्ये चढउतार सुरू आहे. त्यामध्ये 'कोरोना प्यार है' या शीर्षकाचाही समावेश आहे. अभिनेता ऋतिक रोशनच्या 'कहो ना प्यार है' सिनेमाची कथा पुढे नेत ‘करोना प्यार है’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


एका प्रेम कथे भोवती 'कोरोना प्यार है' सिनेमा फिरताना दिसणार आहे.‘इरॉस इंटरनॅशनल फिल्म्स’ने या नावाची नोंदणी केली आहे. सध्या सिनेमाच्या कथेवर काम सुरू आहे. परिस्थिती अटोक्यात आल्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यात येणार असल्याचं वक्तव्य निर्माती क्रिशीका लुल्लाने केलं आहे. 


‘करोना प्यार है’ या व्यतिरिक्त ‘वुहान वेपन करोना’, ‘करोना द ब्लॅक डे’, ‘करोना द इमर्जन्सी’, ‘डेडली करोना’ यांसारख्या चित्रपटांच्या नावांची नोंदणी झालेली आहे. दरम्यान कोरोना व्हायरसच्या दर्शनच्या दहशतीमुळे जवळपास पंधरा दिवस चित्रपटगृहे बंद राहणार आहेत. 


सर्वसामान्यांपासून ते अगदी मोठमोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वजण या कोरोनामुळे धास्तावले आहेत. कलाकार मंडळीही यात मागे नाहीत. जिथे कोरोनामुळे अनेक ठिकाणी दिसणारी गर्दीही आता दिसेनाशी झाली आहे, तिथेच भारतीय कलासृष्टीही काहीशी थंडावली आहे.