मुंबई : सध्या राज्यात कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि राज्य सरकार देखील सतर्क झालं आहे. एवढचं नाही तर बॉलिवूडमध्ये देखील कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. अनेक चित्रपटांच्या सेटवर अनेक कलाकार कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. अशात अभिनेता शाहरूख खान स्टारर 'पठान' चित्रपटाच्या सेटवर कोरोना संक्रमित लोक सापडले आहे. त्यामुळे शाहरूखने स्वतःला क्वारंटाईन केलं आहे. पण सर्व गोष्टी अफवा असल्याचं देखील सांगितलं जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिंकव्हिला प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, 'पठान' चित्रपटाच्या सेटवर एक क्रू मेंबर  कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे यशराज बॅनर खाली तयार होत असलेल्या चित्रपटाची शूटींग थांबवण्यात आली आहे. म्हणून शाहरूखने स्वतःला क्वारंटाईन केलं आहे. पण सूत्रांनी वेगळी माहिती दिली आहे. 


'दोन दिवसांपूर्वी चित्रपटाची शूटिंग सुरू होती. त्यानंतर वेळापत्रकानुसार सोमवार आणि रविवार शूटिंगला ब्रेक देण्यात आला. बुधवारी महाराष्ट्र सरकारच्या बैठकीत लॉकडाउनबाबत निर्णय न घेतल्यास वेळापत्रकानुसार 'पठाण' चित्रपटाची शूटिंग सुरू होईल.' असं सूत्रांनी सांगितलं आहे. 


दरम्यान ,  चित्रपटाची शूटिंग लवकरचं पूर्ण होईल अशी शक्यता होती. पण आता शूटिंगसाठी राज्य सरकारने परवानगी दिली नाही. 'पठान' चित्रपटात शाहरूखसोबत अभिनेत्री दीपिका पादुकोन आणि  अभिनेता जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.