मुंबई : महाराष्ट्र राज्य शासनाकडून जारी करण्यात आलेल्या सरकारी निर्बंधांवरुन समाचार घेत मुंबई उच्च न्यायालयानं शुक्रवारी ६५ वर्षांवरील वयोगटात येणाऱ्या कलाकार, तंत्रज्ञ आणि कलाविश्वाशी संलग्न क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींवरील निर्बंध उठवले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Coronavirus कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता, त्या पार्श्वभूमीवर ६५ वर्षांहून जास्त वय असणाऱ्या मंडळींना स्टुडिओ किंवा चित्रीकरणासाठी बाहेरच्या ठिकाणी जाण्यास काही निर्बंध घालण्यात आले होते. न्यायमूर्ती एस.जे. कथनवाला आणि आर.आय. चागला यांच्या खंडपीठाऩं राज्य शासनातर्फे ३० मे आणि २३ जून या दिवशी काढण्यात आलेल्या जीआरवर निर्णय दिला.


कलाविश्वाशी संलग्न व्यक्तींकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर न्यायालयांकडून ही सुनावणी करण्यात आली. ज्यामध्ये मिशन बिगीन या मोहिमेअंतर्गत मालिकांच्या चित्रीकरणासाठी कलाकार आणि क्र्यू मेंबर्सना सेटवर किंवा स्टुडिओमध्ये जाण्यास निर्बंध घालण्यात आले होते.



हा निर्णय सुनावत असताना इतर सर्व क्षेत्रातील व्यक्तींना काम करण्याची मुभा देण्यात आली असून, टीव्ही आणि सिनेमा जगतातील ६५ वर्षांवरील कलाकारांवरच हे निर्बंध लादण्यात आले, असा सवाल करत हा भेदभावच असल्याचं मत न्यायालयानं मांडलं.