मुंबई : स्वत:च्याच लग्नात आता नवऱ्यामुलासोबत नवरीदेखील नाचण्याची पद्धत अगदी सामान्य झाली आहे. हा नवा ट्रेंडच आला आहे. आपल्या स्वत:च्या लग्नात नवरा-नवरीला नाचताना तुन्ही अनेकदा पाहिलं असेल पण सोशल मीडियावर एका कपलने त्यांच्या साखरपुड्यावेळी केलेला डान्स चांगलाच व्हायरल होत आहे. या कपलने साखरपुड्यावेळी केलेल्या डान्सला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ४० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओला अनेकांना चांगल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वत:च्याच साखरपुड्यात डान्स करणाऱ्या या कपलचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओत कपल ११९७ साली आलेल्या गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्या 'हिरो नं.१' चित्रपटातील 'सोना कितना सोना है' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. आशिष मित्तल नावाच्या एका यूट्यूब चॅलेनद्वारा गेल्या वर्षी २९ डिसेंबरला हा कपल डान्स अपलोड केला गेला होता. या व्हिडिओला आतापर्यंत ४,०४५,१७७ वेळा बघितलं गेलं आहे. या व्हिडिओत डान्स करणाऱ्या जोडप्याचं नाव आशिष मित्तल आणि ईशा मित्तल असल्याचे समजते आहे. 



गोविंदा आणि करिश्मा कपूरचं 'सोना कितना सोना है' हे गाणं प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरलं होतं. १९९७ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट आणि त्यातल्या गाण्यांची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये कायम आहे. गोविंदाचं हेच गाणं नाही इतरही अनेक गाण्यांना आजही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी आलेल्या डान्सिंग अंकल यांचाही गोविंदाच्या 'आप के आ जाने से' या गाण्यावरील डान्स जबरदस्त व्हायरल झाला होता. एका लग्नात संगित समारंभावेळी केलेला संजीव श्रीवास्तव यांनी केलेला गोविंदाच्या गाण्यावरील डान्सही तुफान गाजला होता. यूट्यूबवर या गाण्याला ३७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले होते.