Guess Who : `या` बॉलिवुड अभिनेत्याला ओळखलंत का?
Guess Who : फोटोत तुम्ही पाहू शकता, एक चिमुकला मुलगा आहे. या मुलासोबत त्याचे वडिल देखील आहेत. त्याचे वडिल बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आहेत. तसेच त्याची आई देखील बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री होती. या फोटोतला चिमुकला आता बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता बनला आहे.
Guess Who : सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे (starkids childhood photo) असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्याला (Bollywood Actor) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्याचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला हा अभिनेता ओळखायचा आहे. (cute child smiling in the photo with sunil dutt is bollywood superstar can you guess)
फोटोत काय?
फोटोत तुम्ही पाहू शकता, एक चिमुकला मुलगा आहे. या मुलासोबत त्याचे वडिल देखील आहेत. त्याचे वडिल बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आहेत. तसेच त्याची आई देखील बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री होती. या फोटोतला चिमुकला आता बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता बनला आहे. या अभिनेत्याने बॉलिवूडच्या अनेक सिनेमात काम केले आहे. त्याचे अनेक सिनेमे हिट देखील ठरले आहेत. या अभिनेत्याला तुम्हाला ओळखायचे आहे.
कोण आहे अभिनेता?
फोटोतला हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (sanjay dutt) आहे. संजय दत्त (sanjay dutt) याचा हा लहानपणीचा फोटो आहे. या फोटोत तो वडिल सुनील दत्त यांच्यासोबत बसला आहे. आणि खूप आनंदी दिसत आहे. संजय दत्तची (sanjay dutt) जीवनकहाणी चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. लाडक्या संजूसाठी आधी आईची मांड हेच जग होते, पण आईने जगाचा निरोप घेतल्याने तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. आईच्या मृत्यूनंतर संजय दत्तने (sanjay dutt) स्वतःला ड्रग्जचे व्यसनात अडकवले होते. त्यामुळे त्याचे वडील सुनील दत्त यांना त्याच्यापासून मुक्त होण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता.
दरम्यान सध्या संजय (sanjay dutt) स्वतः आज तीन मुलांचा बाप आहे. त्यांची पहिली मुलगी त्रिशाला दत्तचा जन्म 1988 मध्ये झाला, त्रिशाला ही संजयची पहिली पत्नी रिचा शर्माची मुलगी आहे. तर संजयला मान्यता दत्तपासून दोन मुले, मुलगी इक्रा आणि मुलगा शहारान आहे. संजय अनेकदा त्याची मुले आणि पत्नी मान्यतासोबतचे फोटो शेअर करत असतो.
संजय दत्तने (sanjay dutt) केजीएफ 2 सिनेमात विलनची भूमिका केली होती. त्याचा हा अभिनय प्रेक्षकांना खुप आवडला होता.