मुंबई : बॉलीवुड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या आपल्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. 'नमस्ते लंडन' सिनेमात ती अर्जून कपूरसोबत दिसणार आहे. क्यूट दिसणाऱ्या परिणीतीने नुकतेच फिल्मफेयर मॅग्झीनसाठी फोटोशूट केलं. फिल्मफेयर मॅग्झीनच्या ऑक्टोबर अंकांची ती कवर गर्ल बनलीयं. या बोल्ड फोटोमध्ये ती डार्क ब्लॅक स्मिमसूटमध्ये दिसतेय. यामध्ये तिची फिट फिगर प्रकर्षाने दिसतेयं.



यावर्षी 3 सिनेमा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालदीवमध्ये हे फोटोशूट केलं गेलंय. परिणीती आपला लुक्स आणि हॉट बॉडीने बहिण प्रियांका चोप्राला टक्कर देताना दिसतेय. परिणीती यावर्षी 3 सिनेमांत दिसेल. यामध्ये 'संदीप और पिंकी फरार', 'नमस्‍ते इंग्‍लंड' आणि 'केसरी' हे सिनेमा आहेत. सलग दोन सिनेमांत ती अर्जून कपूरसोबत दिसणार आहे. तर केसरीमध्ये ती अक्षय कुमारसोबत काम करणार आहे. 



19 ऑक्टोबरला रिलीज 



 परिणीती आणि अर्जून सर्वात आधी इश्कजादे सिनेमात सर्वात आधी दिसले होते. या दोघांच्या जोडीला लोकांची चांगली पसंती मिळाली.



आगामी सिनेमांतही त्यांची जोडी प्रेक्षकांना आवडेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. नमस्ते लंडन सिनेमा 19 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.