Alia-Ranbir Daughter Raha : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी चाहत्यांना ख्रिसमसची सर्वोत्तम गिफ्ट दिलं आहे. तब्बल एक वर्षांनंतर त्यांनी राहाची पहिली झलक सर्वांना दाखवली आहे. 2022 मध्ये राहाच्या जन्मानंतर आलिया आणि रणबीरने तिचा चेहरा सर्वांपासून लपवून ठेवला होता. आपण आज अखेर कपूर ख्रिसमस पार्टीत मुलगी राहाची मीडियाशी ओळख करुन देण्यात आली. 



तिची पहिली झलक पाहून तिच्या क्यूटनेसने सर्वांना वेड लावलं आहे. तिचे ते निळे डोळे तर व्वा क्या बात है...त्यात तो पांढरा शुभ्र ड्रेस कपूर कुटुंबाची ही राजकुमारीचं लोभस रुप प्रत्येकावर जादू करत आहे. पापाराझींनी शेअर केलेल्या व्हिडीओंमध्ये राहा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 


डिट्टो आजोबांची कॉपी!


अखेर रणबीर आलियाने लेक राहाचा चेहरा दाखवल्यानंतर डिट्टो आजोबांची कॉपी असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. राहाच्या जन्मापासून त्यांनी नो कॅमेरा पॉलिसी पाळली होती. पण आज अखेर तिचा चेहरा या दोघांनी सर्वांना दाखवला आहे. रणबीर आणि आलिया राहासोबत ऋषी कपूर यांच्या घरी ख्रिसमस पार्टीसाठी आले होते. तेव्हा छोट्या राजकुमारीला बाबा रणबीरने  पापाराझींसमोर आणलं. पण यावेळीही राहा घाबरु नये म्हणून बाबा रणबीरने काळजी घेतली. त्याने इशाराने पापाराझींना चूप राहण्यास सांगितलं. 




या गोंडस मुलीसह तिची आई आलियाही तिथे आली. आजोबा ऋषी कपूर सारखी दिसणारी राहाच्या निळा डोळ्याने नेटकरी थक्क झाले आहेत. ही छोटी गोंडस राजकुमारी पापाराझींना मुळीच घाबरलेली दिसली नाही. त्याचा त्या इवल्यूशा निळा डोळ्यांनी सगळं पाहत होती. 


आलियाने खास तिला ख्रिसमस पार्टीसाठी पांढऱ्या फ्रॉक, लाल बूट आणि केसांचं दोन चंबू बांधून तयार केलं आहे. राहाची पहिली झलक पाहून सगळे कौतुक करत होते