भल्याभल्यांची बोलती बंद करणार दादांचा `वाजवू का?` झी टॉकीजवर या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला
दादा कोंडके यांच्या कोणत्याही सिनेमाचं नाव घ्या, त्या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर अक्षरशः वादळ आणले आहे. दादा कोंडके यांच्या गाजलेल्या सिनेमांचा काळ अनुभवणं ही सिनेमाप्रेंमींसाठी कायमच एक पर्वणी असते. त्यासाठीच झी टॉकीज वाहिनीने ही संधी प्रेक्षकांसाठी आणली आहे. दादा कोंडके यांच्या अनेक सुपरहिट सिनेमांपैकी एक म्हणजे ‘वाजवू का?’ हा सिनेमा.
मुंबई : दादा कोंडके यांच्या कोणत्याही सिनेमाचं नाव घ्या, त्या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर अक्षरशः वादळ आणले आहे. दादा कोंडके यांच्या गाजलेल्या सिनेमांचा काळ अनुभवणं ही सिनेमाप्रेंमींसाठी कायमच एक पर्वणी असते. त्यासाठीच झी टॉकीज वाहिनीने ही संधी प्रेक्षकांसाठी आणली आहे. दादा कोंडके यांच्या अनेक सुपरहिट सिनेमांपैकी एक म्हणजे ‘वाजवू का?’ हा सिनेमा.
रमेश भाटकर आणि नंदिनी जोग या जोडीला पडद्यावर आणले ते या सिनेमाने. दादा कोंडके यांनी अभिनयासोबतच दिग्दर्शनाची धुरा सांभाळत ‘वाजवू का?’ हा सिनेमा बनवला आणि सुपरहिट केला. या सिनेमाची रंगत घरबसल्या पाहण्याची पर्वणी झी टॉकीजवर येत्या रविवारी २२ ऑक्टोबरला दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता मिळणार आहे.
दादा कोंडके म्हणजे मराठी सिनेसृष्टीला लाभलेले एक अनमोल रत्न. ज्यांनी आपल्या चित्रपटांद्वारे मराठी सिनेसृष्टीत स्वतंत्र असे अढळ स्थान निर्माण केले. ग्रामीण मराठी प्रेक्षक आणि शाहीर दादा कोंडके यांचे वेगळे अतूट नाते जमले. दादा कोंडके म्हणजे बाप माणूस, उत्तम प्रतिभा आणि अचूकतेचा संगम. मराठी प्रेक्षकांची नाडी ओळखलेला अवलिया. साचेबद्ध नायकासारखे ना व्यक्तिमत्व, ना सिनेमाक्षेत्रातील गॉडफादर पण तरीही आपल्या हटके अंदाजाने दादा कोंडके यांनी सिनेसृष्टीत आपला दबदबा निर्माण केला.
दादांच्या विनोदाची शैली, त्यांच्या सिनेमांच्या कथा, गाणी, डान्स, संवाद यांनी प्रेक्षकांना मोहिनी घातली. दादा कोंडके यांचा सिनेमा थिएटरमध्ये लागला की त्याकाळातील दिग्गज असलेले शो मॅन राज कपूर, बॉलिवूड स्टार देव आनंद यांनाही त्यांचे सिनेमे प्रदर्शित करण्याची तारीख बदलावी लागायची, ही ताकद होती दादा कोंडके यांच्या सिनेमांची. झी टॉकीज नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी नवं आणि मनोरंजनात्मक देण्याचा प्रयत्न करत असते.
सध्या नवरात्रौत्सवाचे दिवस सुरू आहेत. तेजाचा उत्सव सुरू आहे. अशा काळात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे दीप लावत झी टॉकीज वाहिनी ज्युबीली स्टार दादा कोंडके यांचे सिनेमे दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘वाजवू का?’ हा सिनेमा म्हणजे सबकुछ दादा कोंडके आहे. कथा, पटकथा, संवाद, गाणी, अभिनय, दिग्दर्शन असे दादा कोंडके यांच्या कलाकारीचे खचाखच पॅकेज असलेल्या ‘वाजवू का?’ या सिनेमात उषा चव्हाण आणि दादा कोंडके यांची अफलातून केमिस्ट्रीही पाहता येणार आहे.
सत्तरच्या दशकात दादा कोंडके हे नाव मराठी सिनेसृष्टीवर राज्य करण्यासाठी सज्ज झालं. त्यानंतर दादांचा सिनेमा म्हणजे भरपूर मनोरंजन हे एक समीकरणच झालं. १९९६ ला पडदयावर आलेल्या ‘वाजवू का’ या सिनेमानेही दादा कोंडके यांना बॉक्स ऑफीसवर प्रचंड यश मिळवून दिलं. हा सुपरहिट सिनेमा झी टॉकीजवर येत्या रविवारी २२ ऑक्टोबरला दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता पाहण्याची संधी अजिबात चुकवू नका.