Dadasaheb Phalke Awards: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia bhatt) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अशातच मुंबईत भारतीय चित्रपटसृष्टीचा 'दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' (Dadasaheb Phalke Award 2023) पार पडला. या कार्यक्रमात बॉलिवूडचे दिग्गज कलाकार पोहोचले. अनुपम खेर ते 'कंतारा' अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी, रश्मी देसाई, वरुण धवन यांच्यासह अनेक सेलिब्रिटी या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याचबरोबर आलिया भट्ट आणि हिंदी सिनेसृष्टीतील सदाबहार अभिनेत्री रेखा (Rekha) या दोघींनीही या सोहळयात हजरी लावली होती. त्याचवेळी या सोहळ्यात असं काही तरी घडले ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ (Dadasaheb Phalke Award 2023) अवॉर्डमधील आलिया भट्ट (Alia bhatt) आणि रेखा (Rekha) या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या दोन्ही अभिनेत्रींचा साडीतील लूक सोशल मीडियावर (video Viral) चाहत्यांना घायाळ करत आहे. तर काही चाहत्यांनी संतप्त प्रतिक्रीया दिली. दरम्यान आलिया भट्ट आणि रेखा (alia bhatt And rekha video goes viral) या दोघींच्या साडीचा लूक चाहत्यांना वेड लावत आहे. या अवॉर्ड फंक्शनमध्ये आलिया भट पांढऱ्या साडीमध्ये अगदी सिंपल लूकमध्ये दिसत आहे. तसेच तिचे चांदीचे कानातले आणि छोटी बिंदीमध्ये आलियाचे लूक खूपच आकर्षण दिसत आहे. तर रेखा यांनी नेहमीप्रमाणेच केसांमध्ये गजरा, मोठे कानातले घालून कांजीवरम साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. 


वाचा: ‘द कश्मीर फाइल्स’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी


या व्हिडीओमध्ये आलिया गाडीतून उतरते, तितक्यातच रेखा यांना बघून थांबते आणि त्यानंतरत्या दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ जाऊन घट्ट मिठ्ठी मारताना दिसत आहे. त्यावेळी त्या दोघीही गप्पा मारतानाही दिसत आहे. त्या दोघींनी हातात हात घालून या सोहळ्यात एंट्री घेतल्याचे पाहायला मिळत आहे. पण हा व्हायरल व्हिडिओ पाहून रेखा आणि आलिया ट्रोल झाले आहेत. 



या व्हिडीओत आलिया आणि रेखा हे एकमेकांच्या तोंडासमोर आल्याने अनेकांनी त्यांना ट्रोल केले आहे. हा व्हिडीओ पाहून एक नेटकरी म्हणाला, “असं वाटलं की लिप किस करणार आहेत.” तर एकाने म्हटले की “आलिया किती चिपकते आहे.” तर एकाने “ना सिंदूर लावलं आहे, ना मंगळसूत्र. त्यावर पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे. असं मी केलं असते तर माझ्या सासूने मला टोमणे मारले असते”, अशी कमेंट केली आहे.



वाचा: आलिया सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर रणबीर ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता 


आलिया ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री


या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री आलिया भट्टला 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर आलियाचा पती अभिनेता रणबीर कपूरला 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटातील शिवा या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. रेखाला तिच्या 'चित्रपट उद्योगातील उत्कृष्ट योगदानासाठी' विशेष पुरस्कारही मिळाला.