Dadasaheb Phalke Award 2023:‘द कश्मीर फाइल्स’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

Dadasaheb Phalke Award 2023: दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार जाहीर झाले असून ‘द कश्मीर फाइल्स’ यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला आहे. विवेक अग्निहोत्री यांनी हा पुरस्कार सर्व दहशतवाद पीडितांना आणि देशातील लोकांना समर्पित केला.  

Updated: Feb 21, 2023, 12:14 PM IST
Dadasaheb Phalke Award 2023:‘द कश्मीर फाइल्स’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी title=
'The Kashmir Files' wins the ‘Best Film’ award

Dadasaheb Phalke Award 2023:  भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील तंत्रज्ञ, कलाकारांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणारा ‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार’ (Dadasaheb Phalke Award 2023) वितरण सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणी वर्तुळातील अनेक मान्यवर उपस्थित होते.   चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि लोकप्रिय कलाकारांना या वेळी पुरस्कृत करण्यात आले.

यावेळी एस.एस. राजामौली दिग्दर्शित 'आरआरआर' (RRR) आणि विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटांचा दादासाहेब आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. 'RRR' या चित्रपटाला फिल्म ऑफ द इयर आणि 'द काश्मीर फाइल्स'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. विवेक अग्निहोत्री यांनी हा पुरस्कार सर्व दहशतवाद पीडितांना आणि देशातील लोकांना समर्पित केला. 

वाचा: आलिया सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर रणबीर ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता 

दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्स 2023 मध्ये अनेक बॉलीवूड स्टार्स दिसले. यामध्ये रेखा, अनुपम खेर, आलिया भट्ट, ऋषभ शेट्टी, वरुण धवन, श्रेयस तळपदे, रोनित रॉय या स्टार्सनी छाप पाडली. तर अभिनेत्री आलिया भट्टला (Alia Bhatt) 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. 'ब्रह्मास्त्र'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून रणबीर कपूरची निवड करण्यात आली. 'कांतारा' (kantara) फेम अभिनेता ऋषभ शेट्टीची सर्वोत्कृष्ट प्रॉमिसिंग अ‍ॅक्टर म्हणून निवड करण्यात आली. तसेच वरुण धवनला 'भेडिया'साठी क्रिटिक्स बेस्ट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. तर अभिनेते अनुपम खेर (Anupam Khair) यांना 'द काश्मीर फाइल्स'साठी मोस्ट व्हर्सटाइल अ‍ॅक्टर म्हणून गौरविण्यात आले. रेखा यांचा चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल गौरव करण्यात आला.    

विजेत्यांची संपूर्ण यादी

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट: द काश्मीर फाइल्स
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: चूप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट, आर बाल्की
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता: ब्रह्मास्त्र, रणबीर कपूर,  
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: गंगूबाई काठियावाडी, आलिया भट्ट
  • मोस्ट प्रॉमिसिंग अॅक्टर: कांतारा, ऋषभ शेट्टी
  • चित्रपट उद्योगातील अतुलनीय योगदानासाठी दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 पुरस्कार: रेखा
  • सर्वोत्कृष्ट वेब सिरीज: रुद्र: द एज ऑफ डार्कनेस  
  • समीक्षक सर्वोत्कृष्ट अभिनेता: वरुण धवन (भेडिया)
  • वर्षातील सर्वोत्तम चित्रपट: RRR
  • वर्षातील दूरदर्शन मालिका: अनुपमा
  • वर्षातील सर्वात अष्टपैलू अभिनेता: काश्मीर फाइल्ससाठी अनुपम खेर
  • टेलिव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता: फना-इश्क में मरजावानसाठी,  झैन इमाम
  • सर्वोत्कृष्ट पुरुष गायक: सचेत टंडन, मैय्या मैनु 
  • सर्वोत्कृष्ट गायिका: नीती मोहन, मेरी जान