Alia Bhatt : लेकीचा पायगुण! आलिया सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर रणबीर ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता
Dadasaheb Phalke Awards : मुंबईत नुकताच `दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा 2023` पार पडला असून आलिया आणि रणबीर कपूर या दोघांना `राहा`चा पायगुण चांगलाचा ठरला आहे.
Dadasaheb Phalke Awards 2023 : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांना 2022 हे वर्ष लकी ठरलं. कारण बॉलिवूडची बबली अभिनेत्री आलिया भट्ट आता आई झाली आहे. लेकीच्या जन्मानंतर आलिया आता पुढच्या चित्रपटासाठी सज्ज झाली असताना आलिया आणि रणबीर कपूर यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळाली. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची मुलगी राहा कपूरच्या जन्मानंतर या दोन्ही कलाकारांना आपापल्या चित्रपटांसाठी दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke Awards) मिळाला आहे.
मुंबईत 'दादासाहेब फाळके पुरस्कार' (Dadasaheb Phalke Award 2023) हा सिनेविश्वातील महत्त्वाचा चित्रपट महोत्सव नुकताच पार पडला आहे. संजय लीला भन्साळी यांच्या 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) या चित्रपटातील अभिनयासाठी आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यानंतर आलिया भट्टने (Alia Bhatt) सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमीही दिली आहे. आलियाचा हा फोटो इंस्टाग्रामवर चांगलाच व्हायरल होत असून चाहत्यांकडून अभिनेत्रीचे कौतुक होत आहे. तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेता आणि आलियाचा पती रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) सिनेमातील शिवा या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
आलिया भट्टने 'दादासाहेब फाळके पुरस्कार' (Dadasaheb Phalke Award 2023) सोहळ्यात हजेरी लावली होती. मात्र रणबीर कपूर आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी मुंबईबाहेर असल्याने तो या पुरस्कार सोहळ्यात उपस्थित नव्हता. त्यामुळे आलियाने रणबीरच्या वतीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार स्वीकारला. दरम्यान दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री रेखा आणि आलियाच्या फोटोंनी मात्र नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पुरस्कार सोहळ्यात आलियाने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. 'गंगूबाई काठियावाडी' या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यानदेखील आलियाने पांढऱ्या रंगाच्या साड्या नेसल्या होत्या. तर पुरस्कार सोहळ्यात रेखाने सोनेरी रंगाची कांजीवरम साडी परिधान केली होती.