मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या वादग्रस्त कारकिर्दीवर आणखी एक चित्रपट येत आहे. डॅडी असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. अर्जुन रामपालनं या चित्रपटात अरुण गवळीची भूमिका केली आहे. २१ जुलैला हा चित्रपट रिलीज होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतल्या बंद पडलेल्या गिरण्यांमुळे बेरोजगार झालेले गिरणी कामगार आणि बेरोजगारीमुळे अंडरवर्ल्डच्या मार्गाला गेलेले गिरणी कामगार आणि त्यांची मुलं या कथानकावर आधारित हा चित्रपट आहे.


पांढरे कपडे आणि पांढरी टोपी घातलेला अर्जुन रामपाल कोर्टात उभा राहून सगळे आरोप फेटाळताना दाखवण्यात आलं आहे. याआधीही मराठीमध्ये दगडी चाळ हा चित्रपट आला होता. या चित्रपटामध्ये मकरंद देशपांडे अरुण गवळीच्या भूमिकेत दाखवण्यात आला होता.


पाहा 'डॅडी'चा ट्रेलर