मुंबई : डान्स दिवानेचा येणारा आठवडा खूप धमाकेदार असणार आहे. कारण यावेळी अनेक रिअॅलिटी शोची जज असलेली शिल्पा शेट्टी या शोमध्ये पाहुणी म्हणून येणार आहे. त्याचबरोबर शिल्पी शेट्टी या शोमध्ये कशी एन्ट्री करणार याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. करण कुंद्राच्या निमित्ताने शिल्पा शेट्टी रंगमंचावर नागाच्या रुपात एन्ट्री करणार असून करणच नाही तर चाहतेही तिची स्टाइल पाहून थक्क झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिल्पा नागाच्या अवतारात स्टेजवर पोहोचली
डान्स दिवाने ज्युनियर या रिअॅलिटी शोचा लेटेस्ट प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये स्टेजवर शिल्पा शेट्टीच्या जबरदस्त एन्ट्रीची झलक दाखवण्यात आली आहे. शिल्पा शेट्टी स्टेजवर येताच. नागिन चित्रपटाचं गाणं वाजतं आणि शिल्पा त्यावर नाचते आणि शोचा होस्ट करण कुंद्राकडे बोट दाखवते.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हे पाहून करणही थक्क झाला. त्याचबरोर, गाणं थांबल्यानंतर, शिल्पा सांगते की, ती नागाच्या अवतारात आली आहे कारण करणला आजकाल नाग जास्त आवडतो. त्याचवेळी करणनेही यावर मजेशीर उत्तर देत शिल्पाची बोलती बंद केल्याचं म्हटलं आहे.