मुंबई : अभिनेता, दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर प्रभूदेवा मागील बऱ्याच काळापासून अॅक्शन ड्रामा, ‘Pon Manickavel’ या चित्रपटामुळं चर्चेत होता. काही दिवसांपूर्वीच त्याच्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटातून प्रभुदेवा पहिल्यांदाच पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या हा डान्सिंग स्टार अनेक नव्या धाटणीच्या चित्रपटांची निवड करताना दिसत आहे. असाच एक चित्रपट म्हणजे 'फ्लॅशबॅक'.


प्रभुदेवा या चित्रपटाच्या निमित्तानं एका लेखकाच्या रुपात झळकणार आहे. डॉन सँडीच्या दिग्दर्शनात साकारल्या जाणाऱ्या या चित्रपटामध्ये वयाने मोठ्या असणाऱ्या महिलेवरील प्रेमाची कहाणी सांगण्यात येणार आहे. 


चित्रपटाच्या निर्मात्यांच्या मते, चित्रपटातून अनेक मुद्दे हे अतिशय संवेदनशीलरित्या हाताळण्यात आले आहेत. 


बालू महेंद्र यांच्या ‘अजियथा कोलांगल’ (1979) (Azhiyatha Kolangal) या चित्रपटानंतर काम वासनेवर भाष्य करणारा हा पहिला चित्रपट असेल. 



नात्यांवर भाष्य करणारे असंख्य चित्रपट आतापर्यंत प्रेक्षकांसाठी सादर करण्यात आले आहेत. त्यातच आता 'फ्लॅशबॅक' नेमका कोणत्या नात्याला आणि कशा पद्धतीने हाताळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


'फ्लॅशबॅक'मधून Regina Cassandra ही अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर, Anasuya Bharadwaj ही अभिनेत्री या चित्रपटाच्या निमित्ताने तामिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.