मुंबई : 'दंगल गर्ल' फातिमा सना शेख पुन्हा एकदा नव्या वादात अडकलीय ती सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमुळे... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फातिमानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केलाय... या फोटोवरून ती संस्कृतीच्या ठेकेदारांच्या निशाण्यावर आलीय. या फोटोवरून अनेक जण तिच्यावर टीका करत आहेत. 


फातिमानं आपल्या सोशल अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केलाय... या फोटोला कॅप्शन दिलंय... SHAMELESS SELFIE... 


यानंतर अनेक युझर्सनं फातिमाला साडीच्या मर्यादेचं ज्ञान दिलं... तर काहींनी साडी परिधान करून धर्माचा अपमान केल्याचीही प्रतिक्रिया दिली... परंतु, अनेकांना फातिमाचा हा अंदाजही आवडलाय. 


काही दिवसांपूर्वीही रमजान महिन्यात हॉट बिकिनी फोटो सोशल मीडियावर शेअर करून सना चर्चेत आली होती... कट्टरतावाद्यांनी तिला ट्रोलही केलं होतं. सनानं 'जीक्यू इंडिया'च्या जून एडिशनसाठी हो फोटोशूट केलं होतं.