मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी बाल कलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या बाल कलाकारांनीही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली, पण काही कारणास्तव तिने फिल्म इंडस्ट्रीपासून स्वत:ला दूर ठेवलं आहे. अशीच एक अभिनेत्री म्हणजे सुहानी भटनागर. आमिर खानच्या दंगल या चित्रपटात सुहानी भटनागरने बबिता फोगटची भूमिका साकारली होती. सुहानी आता पूर्णपणे बदलली आहे आणि ती खूप सुंदरही दिसत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जरी सुहानी अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय असते. इंस्टाग्रामवर सुहानीची जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहे. सुहानी अनेकदा तिचे फोटो इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर करत असते. सुहानीचे लेटेस्ट फोटो पाहून तिला ओळखणं कठीण आहे. चित्रपटात सुहानी शॉर्ट हेअरमध्ये दिसली होती पण आता तिने तिचे केसही वाढवले ​​आहेत. सुहानीच्या फोटोंना लाखो लाईक्स येतात


तिच्या लेटेस्ट समोर आलेल्या फोटोत चाहत्यांना इच्छा असली तरी ते छोटी बबिताला ओळखू शकणार नाहीत. शॉर्ट हेअरस्टाइलमध्ये सुहानी एखाद्या क्यूट परीसारखी दिसत आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी हिच तीच लहानगी बबिता आहे, असं कोणीही म्हणू शकत नाही. 


सुहानीने 2016 मध्ये 'दंगल' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं, ज्यामध्ये तिने आमिर खानसोबत स्क्रीन शेअर केली होती. गीता आणि बबिता या दोन्ही बालकलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी दाद दिली आणि त्यांच्या गोंडसपणालाही दाद दिली.


दंगल चित्रपटातील छोट्या बबिताची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. शाळेचा ड्रेस घालून वेणी घातलेली सुहानीला आपण दंगल या चित्रपटातात पाहिल आहे. सिनेमातही सुहानी खूपच क्यूट दिसत होती. हा सीन चित्रपटाच्या त्या भागाचा आहे जिथे गीता आणि बबिता यांना शाळेत पाठवले जात होते.


दंगल चित्रपटानंतर सुहानी भटनागर इतर कोणत्याही चित्रपटात दिसली नाही, असं असलं तरीही ती अजूनही सेलिब्रिटींमध्ये सक्रिय आहे. या फोटोमध्ये सुहानी आणि नेहा कक्कर हसत हसत पोज देताना दिसत आहेत. दंगलची छोटी बबिता फोगट आता खूप मोठी आणि खूप सुंदर दिसते. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते आणि तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. नेहमी ती स्वत:चे फोटो सोशल मीडियावर शेअर करते.



बिग स्क्रिनवर अमिर खानच्या  'दंगल' बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला होता. हरियाणाचे कुस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या मुली गीता आणि बबिता फोगट यांच्यावर आधारित 'दंगल' हा एक बायोपिक सिनेमा आहे. आमीर खानची निर्मीती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी केलं.  हरियाणाच्या एका छोट्याशा गावाची ही गोष्ट आहे. 'दंगल'नं बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम रचला. आमीर खाननं दंगल चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल चाहत्यांचे आभार मानले होते.