मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक बालकलाकार आहेत जे आपल्या अभिनयाव्दापरे नेहमीच चर्चेत असतात. तर असे अनेक कलाकार आहेत जे एका रात्रीत स्टार झाले आहेत. दंगलच्या कलाकारांसोबतही असंच काहीसं झालं होतं. आता तुम्हाला दंगल सिनेमातील लहानपणीची बबिता फोगाट आठवतेय का? दंगल सिनेमात  बबिता फोगाट हे पात्र जिने साकारलं होतं ती कलाकार म्हणजे सुहानी भटनागर (Suhani Bhatnagar). जी अभिनेत्री दंगल सिनेमातून प्रसिद्धी झोतात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 या सिनेमात या अभिनेत्रीने लहानपणीचं पात्र साकारलं होतं. या सिनेमातील तिची भूमिका फक्त पसंत केलं तर तिच्या क्यूटनेसने प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र आता ही बालकलाकार खूप मोठी झाली आणि तिचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसत आहे. चला तर मग आज आम्ही तुम्हाला बबीता फोगाच्या लहानपणी निभवणारी सुहानी भटनागरबद्दल सांगणार आहोत. 


आम्ही तुम्हाला सांगतो की, सुहानीने 2016 मध्ये आलेल्या दंगल सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. ज्यात तिने बबिता फोगाट ही भूमिका साकारली होती. लोकांना ही छोटी बबिता फार आवडली होती. मात्र आता तुम्ही पाहू शकता की ही छोटी बबिता किती मोठी झालीये. भलेही सुहानी सिनेसृष्टीपासून लांब आहे मात्र सोशल मीडियावर ही अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सुहानी तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोत ती फार मोठी झाल्याचं दिसत आहे. ज्यात ती खूप ग्लॅमरसही दिसत आहे.



सुहानी भटनागरचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. 20 हजारहून जास्त लोकं तिला सोशल मीडियावर फॉलो करतात. सुहानी तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर करतच असते मात्र तिच्यासोबतच ती अनेक सेलिब्रिटींसोबतही फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने एखादी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताच ती व्हायरल होते. तिचे चाहते तिच्या प्रत्येक पोस्टवर भरभरुन प्रेम करतात. लवकरच सुहानीच्या चाहत्यांना तिला नव्या प्रोजक्टमध्ये पाहयची ईच्छा आहे. तिचे चाहते नेहमीच तिला याबद्दल प्रश्नही विचारताना दिसतात.