मुंबई : बॉलिवूड सिनेमा 'दशहरा' चा ट्रेलर अखेरिस लाँच झाला. या सिनेमातील स्टार अभिनेता नील नितीन मुकेश आणि इतर कलाकारांची या ट्रेलरमधून ओळख झाली. या सिनेमातील अनेक अॅक्शन क्रूर आहेत. निर्मात्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार 'दशहरा' हा सिनेमा 2018 मघील सर्वात मोठी अॅक्शन फिल्म असणार आहे. कारण या सिनेमात इमोशनल अँगल, सिरीयस स्टोरी आणि उत्कृष्ठ अॅक्शन सीन दाखवण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनीष वात्सल्यच्या 'दशहरा' या सिनेमात नील नितीन मुकेश 11 वर्षाने पहिल्यांदा फिल्मी करिअरमध्ये पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. या सिनेमात टीना देसाई आणि गोविंद नामदेव देखील मुख्य भूमिकेत आहे. 



दशहरा हा सिनेमा हा राजकिय असा थ्रिलर सिनेमा आहे. यामध्ये गुन्हे आणि राजकारणाने प्रेरित असा आहे. या सिनेमाची गोष्ट ही अस्थिर राज्याभोवती फिरते. जो राजकारणी माफिया नेटवर्क, गंभीर अपराध, राजनेता यांसारख्या गोष्टींभोवती या सिनेमाची कथा फिरते.