मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा प्रसिद्ध टीव्ही शो कोणाला माहिती नाही. ही मालिका लोकांच्या मनात घर करून आहे. ज्याचे एपिसोड पाहून लोकं पोटधरुन हसतात. या शोमधील अनेक स्टार्स ही मालिका सोडून गेले आहेत. मात्र, एक पात्र आहे जिची मालिका सोडल्यानंतरही, तिच्या पात्राची भरपाई कोणीही करू शकत नाही, ज्याची आजही चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही बोलत आहोत दिशा वकानीबद्दल, म्हणजेच या शोमधील सशक्त पात्र दया बेनबद्दल आता या टीव्ही शोचा ती भाग नाही. दिशाने 2017 मध्ये मॅटर्निटी रजेवर जाताना शो सोडला. त्यानंतर मेकर्सनी संपर्क साधूनही ती शोमध्ये परतली नाही. या मालिकेच्या निर्मात्यांना सांगावं लागलं की, जर दिशा या शोमध्ये परतली नाही तर ही मालिका नव्या दया बेनसोबत पुढे नेली जाईल.


त्याचवेळी, ती या मालिकेत पुनरागमन करू शकते, अशी बातमी येत आहे. ज्यासाठी तिने काही अटी ठेवल्या आहेत. वास्तविक, समोर आलेल्या रिपोर्टनुसार, दिशाने तीन अटी ठेवल्या आहेत. पहिली अट ती प्रत्येक एपिसोडसाठी पाच लाख रुपये घेईल. दुसरी अट म्हणजे शूटिंगसाठी ती फक्त काही तास देईल. यासोबतच तिची शेवटची अट आहे की, सेटवरच आपल्या मुलासाठी पाळणाघरही बनवावं.


या अटी ऐकल्यानंतर जर निर्मात्यांनी तिची बाजू मान्य केली तर ती पुन्हा एकदा या शोचा भाग बनू शकते.  त्याचबरोबर आता या शोमध्ये दिशा वाकानीची एन्ट्री होते की, चाहत्यांना नवी दिशा शोमध्ये पाहायला मिळणार हे पाहावं लागेल. सध्या या शोबद्दल कोणतेही अधिकृत विधान समोर आलेलं नाही पण चाहते आता लवकरच शोच्या अपडेटची वाट पाहत आहेत.